नांदेड(प्रतिनिधी)-500 रुपये दराच्या बालकांच्या खेळण्याच्या नोटा देणाऱ्या दोन जणांविरुध्द दहशतवाद विरोधी पथकाच्या सहाय्यक पोलीस निरिक्षक यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने या दोघांना चार दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
गंगाधर तुकाराम गायकवाड रा.कंधार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जनार्धन जिल्हेवाड उंडगा (उ) ता.लोहा जि.नांदेड आणि आकाश उत्तम सावंत रा.भुतेकरवाडी ता.अहमदपूर जि.लातूर या दोघांनी मिळून त्यांना 100 रुपयांच्या तिन नोटा दिल्या आणि सांगितले की, अशा खोट्या नोटा आम्ही बनवत आहोत तुम्ही कोठेही या नोटा चालवा त्या चालतात.गंगाधर तुकाराम गायकवाड यांनी त्या 100 रुपये दराच्या नोटा मार्केटमध्ये चालवल्या आणि त्या चालल्या पण. प्रत्यक्षात त्या 100 रुपयांच्या तीन नोटा खऱ्या होत्या. त्यानंतर त्यांना विश्र्वास आला. म्हणून त्यांनी 500 रुपये दराच्या नोटा घेण्याचे आरोपींकडून कबुल केले. तेंव्हा जर्नाधन जिल्हेवाड आणि आकाश सावंत यांनी त्यांना 1174 एवढ्या संख्येच्या 500 रुपये दराच्या नोटा देतांना सहाय्यक पोलीस निरिक्षक दहशतवाद विरोधी पथक बाबासाहेब पाराजी थोरे यांनी त्या दोघांना पकडले. 500 रुपये दरांच्या नोटाचे बंड तपासले असता त्यामध्ये सर्वप्रथम आणि सर्वात शेवटी 500 रुपये दराची नोट खरी होती परंतू त्यामध्ये असलेल्या 98 नोटा बालकांसाठी खेळण्यासाठी बनवलेल्या खोट्या नोटा होत्या.
यानंतर बाबासाहेब थोरे यांनी दिलेल्या तक्ररीवरुन जर्नाधन जिल्हेवाड आणि आकाश सावंत या दोघांविरुध्द माळाकोळी पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 489(ब)(क) सोबत 420 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 151/2023 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास माळाकोळीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक नरेशकुमार मुुंडे यांच्याकडे आहे. पोलीसांनी पकडलेल्या दोघांना न्यायालयात हजर केले असतांना न्यायालयाने त्या दोघांना चार दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
खेळण्याच्या नोटा दाखवून फसवणूक करणारे दोन जण पोलीस कोठडीत