नांदेड(प्रतिनिधी)-गाडीचा काच फोडून गाडीत असलेली 2 लाख 28 हजार 900 रुपये रोख रक्कम एसबीआय बॅंक नायगावसमोरून चोरट्यांनी पळवली आहे. तसेच मुखेड येथे दोन गाई आणि एक गोरा असे 67 हजार रुपयांचे पशुधन चोरीला गेले आहे.
सुभाष नारायण पवार यांनी आपली चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.39 जे 7816 ही दि.10 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.50 ते 4.10 वाजेपर्यंत नायगाव येथील मेडेवार कॉम्प्लेक्स, एस.बी.आय. बॅंकसमोर उभी केली होती. कोणी तरी चोरट्यांनी रेकी करून त्या चार चाकी गाडीच्या मागच्या बाजूचा डाव्या भागातील काच तोडून 2 लाख 28 हजार 900 रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे.नायगाव पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 153/2023 दाखल केला आहे. पुढील तपास नायगावचे पोलीस निरिक्षक गुट्टे हे करीत आहेत.
मुखेड येथील रावसाहेब व्यंकटी बाभळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 11 ऑक्टोबरच्या रात्री 1.41 वाजता त्यांच्या घरासमोर बांधलेल्या दोन तांबड्या रंगाच्या गाई व एक गोरा असे 67 हजार रुपयांचे पशुधन चोरून नेले आहे. मुखेड पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून श्रेणी पोलीस उपनिरिक्षक भारती अधिक तपास करीत आहेत.
गाडीचा काच फोडून 2 लाख 28 हजारांची चोरी