हेमंत पाटलांना अटक करा, त्यांचे समर्थन करणाऱ्या लोकांविरुध्द ऍट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करा-वंचित बहुजन आघाडी

नांदेड(प्रतिनिधी)-हेमंत पाटील मुर्दाबाद, हेमंत पाटील यांना अटक झाली पाहिजे अशा घोषणांनी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आलेल्या आंदोलनाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील परिसर दणाणून गेला.
याप्रसंगी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्यपाल यांना पाठविलेल्या निवेदनात वंचित बहुजन आघाडीने नमुद केले आहे की, लोकप्रतिनिधी असलेल्या खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.शाम वाकोडे यांच्यासोबत केलेले वर्तन मानवी हक्कांच्या विरुध्द आहे. तसेच भारतीय संविधानाने दिलेल्या मुलभुत हक्कांवर गदा आणल्यासारखे आहे. तेंव्हा त्यांच्याविरुध्द दाखल झालेल्या गुन्ह्यात खासदार हेमंत पाटील यांना 48 तासात अटक होणे आवश्यक आहे. ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत आरोपी असलेले खासदार हेमंत पाटील यांच्या जातीयवादी कृतीचे समर्थन करणाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रसारीत करण्यात आली आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दबंगगिरी करणाऱ्या खाजगी गुत्तेदारांची निविदा रद्द व्हावी असेही या निवेदनात म्हटले आहे.
सकाळपासून या आंदोलनाची सुरूवात झाली यावेळी मोर्चात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतात या घटनेचा निषेध करत दोषींवर कार्यवाही झाली पाहिजे अशी भुमिका घेतली. याप्रसंगी मराठवाडा सदस्य डॉ. संघरत्न कुऱ्हे, महानगर अद्यक्ष विठ्ठल गायकवाड, आयुब पठाण, जिल्हाध्यक्ष राजेश हत्तीअंबीरे , शिवा नरंगले, महानगर महिलाद्यक्षा चंद्रकला चापलकर ,माजी जिल्हाद्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले, महासचिव श्याम कांबळे, तालुकाध्यक्ष विनायक गजभारे, रामचंद्र वंणजे, मुकुंद नरवाडे, अशोक काकांडीकर, अशोक, कापसीकर, दीपक कसबे, प्रा. राजू सोनसळे, ऍड. यशोनील मोगले, बहुजन लोकन्याय संघाचे राहुल चिखलीकर, माधव चित्ते, रावण साम्राज्य सेनेचे काकासाहेब डावरे गयाताई कोकरे, साधना येंगडे, मंगेश देवकांबळे आदींची यावेळी भाषणे झाली.यावेळी युवा आघाडीचे राज्य सदस्य अक्षय बनसोडे, महिला जिल्हाध्यक्ष दैवशाला पांचाळ, कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष केशव कांबळे, सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे भीमराव सूर्यवंशी , युवा जिल्हाध्यक्ष धीरज हाके, संजय टिके, भीमराव बेंद्रीकर, सुरेश गजभारे, देवांनंद सरोदे, शंकर महाजन, डॉ भेदे, गोपालसिहं टाक, वैभव लष्करे, विनय मोरे, हिदायत खान पठाण, शेख अकबर, संतोष पाटील, सतीश आणेराये, रामकिशन पालनवार , एकनाथ जिंकले, गौतम देवके , साहेबराव डोईवाड, सुदर्शन कांचनगिरे, संदेश गायकवाड, प्रकाश सोंडारे, शरद सूर्यवंशी, संघसेन जोंधळे, साहेबराव भंडारे, धम्मदीप येंगडे, शिवाजी पवार, दिनेश, कांबळे, इम्रान पठाण, माधव गोवंदे प्रभाकर घंटेवाड, बबन जोंधळे, प्रेमानंद गायकवाड, दीपक मगर, कोश्यल्याताई रणवीर, विजया वाघमारे, सोनिया गायकवाड, सुनंदाताई वंणजे, ममता भद्रे, दीपक गजभारे, केशव सदावर्ते, केतन भेडेकर, नागेश दुधमल, सोपान वाघमारे, रवी शेळके आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 48 तासात खा. हेमंत पाटील यांना अटक झाली नाही तर संवैधानिक मार्गाने उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *