नांदेड(प्रतिनिधी)-एकापेक्षा जास्त घरात झालेल्या चोरी प्रकरणी देगलूर पोलीसांनी एकच गुन्हा दाखल केला आहे. या चोरी प्रकरणात 2 लाख 22 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
सय्यद मुख्तार उस्मानसाब यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.13 ऑक्टोबच्या सकाळी 6 वाजेच्यासुमारास त्यांच्या आणि काही इतर जणांच्या घरी चोरी झाली. त्यामध्ये सोन्याचे नॅक्लेस, सोन्याचे गलसर, सोन्याचे कानातील रिंग, सोन्याच्या अंगठ्या, चॉंदीचे पायातील चैन, झुमके, रोख रक्कम असा ऐवज चोरीला गेला आहे. यामध्ये 1 लाख 71 हजार 200 रुपयांचा ऐवज सय्यद मुख्तार उस्मानसाब यांच्या घरातून चोरीला गेला आहे. तर त्यांचे शेजारी शेख जावेद यांच्या घरातून चोरट्यांनी 52 हजारांचा ऐवज चोरला आहे. या दोन्ही घरात मिळून 2 लाख 22 हजार 900 रुपयांची चोरी झाली आहे. देगलूर उपविभागाचे अत्यंत जबरदस्त मेहनती अधिकारी पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख यांच्यासह पोलीस निरिक्षक संजय हिब्बारे, पोलीस उपनिरिक्षक मुंडे, यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर गुन्हा क्रमांक 441/2023 दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरिक्षक रवि मुंडे अधिक तपास करीत आहेत.
देगलूरमध्ये दोन घरात 2 लाख 23 हजारांची चोरी; एकच गुन्हा दाखल