नांदेड,(प्रतिनिधी)-बँकेतून आपल्या पत्नीच्या उपचारासाठी आणलेले 5 हजार रुपये बरकी चौकात एका ठकबाजाने पैसे आणलेल्या व्यक्तीस बनवून बळजबरीने नेले आहे. हा घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये अर्धवट दिसतो आहे.
काल दिनांक 13 ऑक्टोबर रोजी चौफळा भागातील शंकर चिंतामणी कळसकर हे वयस्कर व्यक्ती गुरुकृपा मार्केटमधील युनियन बँकेत गेले होते. बँकेतून त्यांनी 5 हजार रुपये काढून आपल्या खिशात ठेवून परत आपल्या घराकडे चौफाळा येथे पायी जात असतांना त्यांच्या पाठलाग करत आलेल्या व्यक्तीने बर्की चौकात त्यांना एका कोपऱ्यात नेऊन त्यांच्या खिशातील 5 हजार रुपये काढून घेतले आहेत. हा प्रकार दुपारी 1 वाजता घडलेला आहे.
शंकर चिंतामणी कळसकर यांनी आपल्या आजारी पत्नीच्या उपचारासाठी पाच हजार रुपये बँकेतून काढले होते. बरकी चौकात दिसणाऱ्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये शंकर चिंतामणी कळसकर यांचे पैसे काढणारा व्यक्ती गुलाबी रंगाचा शर्ट घातलेला आहे आणि पैसे काढताच त्याने समोर असलेल्या ऑटो मध्ये बसून गेल्याचे दिसते.
शंकर कळस्कर यांच्या सोबत घडलेल्या या घटनाक्रमातून नक्कीच असे दिसते की बँकेत पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तींवर नजर ठेवली जाते. त्यांचे वय आणि त्यांची शारीरिक परिस्थिती पाहून त्यांचा पाठलाग केला जातो आणि संधी शोधून त्यांचे पैसे लुटले जातात वय जास्त असलेल्या लोकांनी बँकेत जाताना आपल्या सोबत कोणालातरी घेऊन जावे, अशी विनंती वास्तव न्यूज लाईव्हच्यावतीने करण्यात येत आहे. याबद्दल गुन्हा दाखल झाला की नाही याची माहिती वृत्त लिही पर्यंत प्राप्त झाली नव्हती.