नांदेड(प्रतिनिधी)-आज 15 ऑक्टोबर भारताचे मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी पोलीस अधिक्षक कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले आणि आजचा हा वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात आज महापुरूषांच्या यादीतील मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनी सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे, पोलीस उपनिरिक्षक पी.जी.आवडे, दत्तात्रय काळे आदींसह अनेकांनी त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भारताचे माजी राष्ट्रपती तथा मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून सुध्दा साजरा करण्यात येतो. पोलीस अधिक्षक कार्यालयातील सर्व विभागांचे अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी या अभिवादन समारंभात उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अंमलदार संजय सांगवीकर आणि मारोती कांबळे यांनी केले.
पोलीस अधिक्षक कार्यालयात मिसाईल मॅन यांना अभिवादन