नांदेड(प्रतिनिधी)-ग्रामीण तंत्रनिकेतन ते पांगरा रस्त्यावर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सिकंदरपुर ता.जि.लातूर येथील जमीर दिलावर शेख (28) याची तपासणी केली असता त्याने नांदेडमध्ये विक्री करण्यासाठी आणलेले एक गावठी पिस्तुल आणि तीन जीवंत काडतूसे असा 36 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडे सापडला.
या कामगिरीमध्ये पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, खंडेराय धरणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक श्री.गोविंदरावजी मुंडे, सचिन सोनवणे, आशिष बोराटे, दत्तात्रय काळे यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक माधव केंद्रे, संजय केंद्रे, पोलीस अंमलदार गुंडेराव कर्ले, हनमंत पोतदार, संग्राम केंद्रे, बालाजी तेलंग, संजीव जिंकलवाड, देवा चव्हाण, विलास कदम, गजानन बैनवाड, रणधिरसिंह राजबन्सी, मारोती मोरे, ज्वालासिंग बावरी, सायबर सेलचे दिपक ओढणे आणि राजू सिटीकर यांनी मेहनत घेतली.
