नांदेड(प्रतिनिधी)-किनवट येथील सुरेश दत्तात्रय मस्के यांचा 14 ऑक्टोबर रोजी रात्री 10.15 ते 10.45 वाजेदरम्यान कोणी तरी अज्ञात माणसांनी अज्ञात कारणावरुन त्यांच्या डोक्यावर गंभीर जमखी करून त्याचा खून केल्याचा प्रकार घडला आहे.
स्नेहा सुरेश मस्के (28) रा.हमाल कॉलनी किनवट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे लग्न सुरेश मस्के सोबत झाले. सध्याच्या परिस्थितीत स्नेहा मस्के ह्या गरोदर आहेत. सुरेश दत्तात्रय मस्के हे पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत होते.
14 ऑक्टोबर रोजी स्नेहा मस्केला गरोदरपणाबद्दल काही तरी समस्या आली असतांना सुरेश मस्के हे स्नेहा मस्केला घेवून आपल्या चार चाकी होंडाई आयटोनमध्ये घेवून सरकार रुग्णालयात रात्री 8 वाजता निघाला. रस्त्यात त्यांची चार चाकी गाडी खराब झाली. हा प्रकार हबीब कॉलनीसमोर घडला. त्यानंतर आमच्या दोघांच्या ओळखीचा ऍटो चालक सिकंदर हा तेथून जात असतांना सुरेश मस्केने स्नेहला सिकंदरच्या ऍटोत पाठवून उपचार घेण्यासाठी सांगितले. ते मेकॅनिक शोधत होता. स्नेहाचा उपचार झाल्यानंतर तीने सुरेश मस्केला फोन केला. तेंव्हा त्यांनी सांगितले की, मी 10 मिनिटात येत आहे. तोपर्यंत रात्रीचे 10 वाजले होते. पुन्हा-पुन्हा फोन केल्यावर सुरेश मस्के फोन उचलत नव्हता. त्याचा फोन नातलग गणेश गायकवाडने उचला. त्यांनी सांगितले की, सुरेश दत्तात्रय मस्केच्या डोक्यातून रक्त निघत आहे. त्याच्या डोक्यावर डाव्या बाजूला गंभीर जखम होती. त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेले असतांना डॉक्टरांनी सुरेश मस्के हे मयत झालेचे घोषित केले.
स्नेहा मस्केच्या तक्रारीवरुन किनवट पोलीसांनी अज्ञात कारणासाठी अज्ञात व्यक्तींनी सुरेश मस्केचा खून केला या सदरातखाली भारतीय दंड संहितेच्या कलम 302 नुसार गुन्हा क्रमांक 145/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक दिपक बोरसे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
