नांदेड(प्रतिनिधी)– कैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फौंडेशन अंतर्गत जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान बालविवाह मुक्त जिल्हा कृतीदलतील जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, उप मुख्य कार्यकारी (बाल कल्याण) रेखा काळम कदम,महिला व बाल विकास अधिकारी आर आर कागने , जिल्हा बाल सरक्षण अधिकारी विद्या आळने, जिल्ह्यातील सर्व प्रशासनाच्या वतीने बाल विवाह मुक्त भारत 16 ऑक्टोबर रोजी सर्वत्र जिल्ह्यातील शाळा , महाविद्यालयात , गावात गावात हजारो लोकांच्या उपस्थिती मध्ये बाल विवाहाच्या विरुद्ध शपथ पत्र रैली कॅडल मार्च इत्यादी कार्यक्रमाच्या माध्यमांतून बाल विवाह कोणत्याही परीस्थित पूर्णपणे बंद झाला पाहिजे असा संदेश देणार आहे. यावेळी जनसेवा प्रतिष्ठान संस्थेचे समन्वयक अजय गायकवाड , समुपदेशक निलेश कुलकर्णी , SBC 3 समन्वयक मोनाली धूर्वे विविध सामाजिक संस्था कार्यकर्ते तसेच विविध शाळा महाविद्यालयात सर्व शिक्षक विद्यार्थी महिला उपस्थित होते.
बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे. यात मुलाकडील आणि मुलीकडील मंडळीसह लग्न जुळविनारे, लग्नास येणारे, लग्नाची विधी म्हणणारे, स्वयंपाक करणारे सर्वजण आरोपी ठरतात. त्यामुळे बालविवाहासंदर्भात कुठलीही माहिती असल्यास तत्काळ स्थानिक प्रशासनाला किंवा 1098 या टोल फ्री क्रमांकावर यासंदर्भात माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.