नांदेड(प्रतिनिधी)-दि.11 ऑक्टोबर रोजी घरात असलेल्या एकट्या महिलेला लुटणाऱ्या गुन्हेगाराचे रेखाचित्र नांदेड जिल्हा पोलीसांनी जारी केले असून जनतेने या रेखाचित्रासोबत जुळणारा व्यक्ती कोठे पाहिल्यास पोलीस ठाणे भाग्यनगर येथे याबाबतची माहिती द्यावी असे आवाहन केले आहे.
10 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वाजेच्यासुमारास कॅनॉल रोडवर राहणाऱ्या शुभांगी आशिष दोडके (38) ह्या एकट्याच घरी असतांना एक अज्ञात व्यक्ती कोणाच्या जाधवचा पत्ता विचारत त्यांच्यासमोर आला. तो जाधव ह्या भागात कोणी नाही असे सांगितल्यानंतर तो अज्ञात हल्लेखोर शुभांग दोडकेच्या घरात शिरला आणि त्यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण बळजबरीने चोरून नेले. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 394, 397, 452, 342 आणि 506 नुसार गुन्हा क्रमांक 373/2023 दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक सुर्यमोहन बोलमवाड यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण हे करीत आहेत.
भाग्यनगर पोलीसांनी पिडीत महिला शुभांगी दोडके यांच्याकडून मिळवलेल्या माहितीनुसार त्या गुन्हेगाराचे रेखाचित्र तयार करून करून घेतले आहे. त्यामध्ये तो अज्ञात खल्लेखोर 40 ते 45 वयाचा असावा, त्याचा शरिर बांधा मध्यम आहे. रंग सावळा आहे. उंची अंदाजे साडे पाच फुट आहे. गुन्हा करतांना तो मराठी भाषेत बोलत होता. या आरोपीबद्दल जनतेतील कोणाला माहिती मिळाली किंवा वर उल्लेखीत वर्णनाचा आणि रेखाचित्रात दिसणाऱ्या माणसा सारखा माणुस कोणाला दिसल्यास त्यांनी याबद्दलची माहिती भाग्यनगर पोलीसांना द्यावी असे पोलीस विभागाने कळविले आहे. जनतेची माहिती भाग्यनगर पोलीस ठाण्याचा दुरध्वनी क्रमांक 02462-261364, पोलीस निरिक्षक सुर्यमोहन बोलमवाड यांचा मोबाईल क्रमांक 8888553343 आणि सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण यांचे मोबाईल क्रमांक 7020408595 आणि 9767747774 यावर सुध्दा देता येईल.
भाग्यनगर पोलीसांनी महिलेवर हल्ला करणाऱ्याचे रेखाचित्र जारी करून जनतेस आवाहन