नांदेड- श्रीकृष्ण अर्थात सर्वांना आकर्षित करणारे व्यक्तीमत्व द्वापर युगा पासून आजपर्यंत श्रीकृष्ण यांना देव स्वरुप मानले जाते.आज नांदेड जिल्ह्यात पोलीस अधिक्षक पद भूषवणारे श्रीकृष्ण दत्तात्रय कोकाटे यांनी नांदेडला आल्यानंतर जनतेसाठी घेतलेेली मेहनत त्यांच्या आकर्षणाचा विषय आहे.म्हणूनच आकर्षक अशा श्रीकृष्ण कोकाटे यांना त्यांच्या जन्मदिनी शुभकामना देण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न.
दत्तात्रयजींचे पुत्र असलेले श्रीकृष्ण या दोन नावांना जोडून जेंव्हा आम्ही जगाकडे पाहु तेंव्हा संपुर्ण विश्वातील योगसिध्दी प्राप्त करून नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक पद भुषवणारे यांचा जन्म दत्तात्रय कोकाटे यांच्या घरात 17 ऑक्टोबर 1976 रोजी झाला. आपले प्राथमिक शिक्षण सेंट लॉरेंस हायस्कूल छत्रपती संभाजीनगर येथे पुर्ण केल्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी सरस्वती भवन येथे पुर्ण केले. त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी देवगिरी महाविद्यालयातून मिळवली. त्यानंतर विधी शाखेची पदवी त्यांनी माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथून पुर्ण केली. जेंव्हा त्यांची तयारी जीवनाच्या समोर जाण्याची झाली. तेंव्हा त्यांनी पोलीस उपनिरिक्षक, एसटीआय, एएसएसपी अशा अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये विजय मिळवला. सन 2001 च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत ते महाराष्ट्रात सर्व प्रथम क्रमांकावर उत्तीर्ण झाले होते. सन 2004 मध्ये ते पोलीस उपअधिक्षक या पदावर रुजू झाले. एक वर्ष प्रशिक्षण काळ पुर्ण केल्यानंतर पहिली परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक या पदावर सांगली जिल्ह्यात काम केले. नियमित पोलीस उपअधिक्षक पद मिळाल्यानंतर सन 2006 ते सन 2008 या काळात नक्षलग्रस्त भाग असलेल्या गोंदिया येथे काम केले. सन 2008 ते सन 2011 या दरम्यान हेड पुणे आणि देहुरोड पुणे या उपविभागात काम केले. 2018 ला अपर पोलीस अधिक्षक ही पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांनी लातूर जिल्ह्यात 2014 पर्यंत सेवा दिली. त्यादरम्यान नांदेडचे पोलीस अधिक्षक विठ्ठल जाधव हे आजारी असल्यामुळे श्रीकृष्ण कोकाटे यांनी जवळपास 18 दिवस नांदेड जिल्हा पोलीस दलाचा पोलीस अधिक्षक हा पदभार सांभाळला होता. त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील वसई येथे 2014 ते 2016 या दरम्यान काम केले. त्यानंतर 2016 ते 2017 दरम्यान त्यांनी एआयजीपी पदावर काम पाहिले. पुढे नाशिक येथे 2017 ते 2019, ठाणे शहरात 2019 ते 2021 आणि मुंबई शहरात 2021 ते 2022 या दरम्यान पोलीस उपआयुक्त पदावर काम केले. यादरम्यान त्यांनी आपली गुणवत्ता दाखवून भारतीय पोलीस सेवेत प्रवेश केला आणि दि. 22 ऑक्टोबर 2022 पासून त्यांनी नांदेडचे पोलीस अधिक्षक पद सांभाळत आहेत.

आपल्या पोलीस सेवा कालखंडात त्यांनी उत्कृष्ट तपास करून दोषारोप पत्र सादर केलेल्या कामासाठी पोलीस महासंचालकांनी सन 2010 मध्ये त्यांना सन्मान चिन्ह दिले. सन 2011 मध्ये नक्षलवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करून त्या प्रकारचा तपास केल्याप्रकरणी त्यांना आंतरिक सुरक्षा पदक मिळाले. नक्षलग्रस्त भागात काम केलेल्या सेवेसाठी त्यांना सन 2011 मध्ये खडतर सेवा पदक प्राप्त झाले. तसेच फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉर्मस ऍन्ड इंडस्ट्रीज या संस्थेने त्यांना सन 2018 मध्ये बेस्ट प्रेक्टीसेस इन पोलीसींग हे ऑर्वाड दिले. अशा या आपल्या सुंदर ईतिहासास श्रीकृष्ण कोकाटे आज नंतर नांदेड जिल्ह्यात 22 ऑक्टोबर रोजी 365 दिवस पुर्ण करणार आहेत.
दत्तात्रयजींचे सुपूत्र असलेले श्रीकृष्ण कोकाटे म्हणजे जगाचा गुरू असणाऱ्या दत्तात्रयजींच्या शिकवणीत वाढले आहेत. भगवान दत्तात्रयांबद्दल बोलतांना असे सांगितले जाते की, गुरू कोणी व्यक्ती नाही, कोणी शरीर नाही गुरू हे एक तत्व आहे, गुरू एक शक्ती आहे, गुरू एक भाव आहे. गुरू एक श्रध्दा आहे, गुरू एक सर्मपण आहे, आपल्या व्यक्तिमत्वाचा परिचय आपले गुरूच करुन देतात.याच भावनेतून दत्तात्रयजी कोकाटे यांनी आपल्या सर्व बालकांचा शिक्षण दिले आणि त्यांच्या सर्व बालकांनी आपला गुरू किती सर्मपक आहे हे सिध्द केले. गुरू हा दृष्टा भावानेच मिळतो, गुरू नशिबाने मिळतो आणि नशिबवाल्यांनाच गुरू मिळतो अशा या भावातून दत्तात्रयजी कोकाटे यांचे सुपूत्र श्रीकृष्ण कोकाटे यांनी नांदेड जिल्ह्यात आल्यानंतर हे सिध्द करून दाखवले. ते प्रयत्नशिल राहतात, जागरुकता ठेवतात आणि परिश्रम घेतात आणि या आपल्या सर्व मेहनतीने ते नांदेड जिल्ह्यासाठी सौभाग्य तयार करत आहेत.श्रीकृष्ण कोकाटे यांचे लग्न सौ. स्नेहल यांच्याशी झाले. श्रीकृष्ण आणि स्नेहल यांच्या घरकुलात आदिती आणि आरव हे दोन पुष्प सुंदरता वाढवत आहेत.

खडकावर आदळून शांत भावाने परत समुद्रात विलिन होणाऱ्या लाटांसारखेच श्रीकृष्ण कोकाटे नेहमी सहनशिलताच दाखवतात. काही ठिकाणी त्यांनी आपण ज्या प्रमाणे कॉम्प्युटरला रिफ्रेश करतो त्याप्रमाणे कधी-कधी त्यांनी जनतेत अशांतता माजविणाऱ्यांसाठी कॉम्प्युटरप्रमाणे एफ-5 हे बटन सतत दाबून ठेवतात. श्रीकृष्ण कोकाटे यांना जनता पाहते तेंव्हा त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पाहणारे काही मोजकेच असतील. पण त्यांच्या चेहऱ्यामागे अध्ययन केले जाईल तेंव्हा त्यांच्या मनात घुमणारे नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळे आव्हान त्यांचा चेहरा निरव आणि शांत ठेवतात. म्हणूनच असे म्हटले जाते शब्द आणि व्यवहार ही माणसाची खरी ओळख आहे. चेहऱ्यावरील स्मित हास्यापेक्षा त्यांच्यात असलेली ती निरव शांतता खुप महत्वपुर्ण आहे. जे डोळ्यात दिसते ते फक्त एक चित्र असते पण त्या डोळ्यांमागे लपलेले वादळ ओळखता येत नाही आणि हीच त्यांची शक्ती नांदेड जिल्ह्यातील त्यांच्या सहकारी पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांवर कायम वचक ठेवते. आजपर्यंतच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांच्याकडून कधीच दु:ख व्यक्त झालेल दिसल नाही. त्यांच्या व्यवहाराचे वर्णन करूत तेंव्हा आयुष्यात काय कमावलं आणि काय गमावलं यापेक्षा त्यांनी कोणाला स्वत:च्या स्वार्थासाठी फसवल नाही ही त्यांच्यातील ताकत आहे.
श्रीकृष्ण कोकाटे यांच्यातील प्रतिसाद आणि प्रतिक्रिया नेमकी ओळखता येत नाही. पण त्यांचा प्रतिसाद नेहमी सकारात्मक असतो, साथ देणारा असतो. म्हणून यांच्या प्रतिसादाऐवजी त्यांच्या प्रतिक्रियेवर लक्ष केंद्रीत करणाऱ्यांच्या जीवनात नक्कीच एक मोठा बदल होईल. जीवन हे जगण्यासाठी असत झुरण्यासाठी नव्हे, कोणास दाखविण्यासाठी तर मुळीच नाही आणि या यशातच ते समाधान मानुन जीवन जगातत, जीवनाचा आनंद घेतात म्हणूनच त्यांच्या यशाला सिमा नाहीत. यशाला सिमा ही नसते आणि अंतही नसतो. आपण ज्यांना जितके पुढे जातांना पाहतो तेवढ्याच श्रीकृष्ण यांच्या सिमा वाढत आणि विस्तारत जातात. क्षितिजावर आपण जेंव्हा नजर ठेवतो तेथे एका ठिकाणी आकाश डोंगरावर टेकल्यासारखे दिसते अशाचप्रकारे श्रीकृष्णांना पाहणाऱ्यांबद्दल ते जवळजावून पाहतात तेंव्हा आकाश पुन्हा उंचच असते अशाच पध्दतीने श्रीकृष्णांच्या जीवनातील प्रक्रिया पुर्ण होवून त्यांना मिळालेले यशही अंतहिन आहे. ज्या व्यक्तींनी आपली सुरूवात ईमानदारी, स्वकष्ट आणि शुन्यापासून केलेली असते त्यांना हरण्याची, घाबरण्याची, ओळखनिर्माण करण्याची गरज नसते हे श्रीकृष्ण कोकाटे यांच्याबद्दल लिहावेसे वाटते. आपल्या पोलीस सेवा काळात त्यांनी सुध्दा अनेक षडयंत्र (खलबत)पाहिले असतील. परंतू त्यांनी आपला चांगुलपणा सोडला नाही. कारण चूलीतून निघणाऱ्या धुरात आकाशाला काळे करण्याची सामर्थ्य कधीच नसते. आपले वडील श्री.दत्तात्रयजी यांच्या कडकपणा सहन केला म्हणून ते आज यशवंत झाले आहेत अशा या श्रीकृष्ण कोकाटे यांना वाढदिवसाच्या शुभकामना देतांना असे म्हणावे वाटते की, आपण जेंव्हा कोणासाठी काही चांगल करत असतो तेंव्हा आपल्यासाठी सुध्दा कोठे तरी, काही तरी चांगल घडत असत. इतकंच की ते आज आपल्याला दिसत नसत. आपल्या यशाचा ध्वज आभाळभर फडकावा या शब्दांसह नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना आमच्या शब्दातून शुभकामना.