
नांदेड(प्रतिनिधी)-बालिकांनी स्वत: मेहनत केल्याशिवाय त्यांना हवे ते यश प्राप्त होणारच नाही म्हणून बालिकांनी आपल्या जीवनात जास्तीत जास्त मेहनत घ्यावी. भारत देशात काम केलेल्या महिला आणि महापुरूषांची केलेल्या कामाची शक्ती स्वत:मध्ये कशी येईल यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर यांनी आज झालेल्या नवदुर्गा सन्मान व महिला सुरक्षा जनजागृती कार्यक्रमात सांगितले.

आज शहरातील कुसूम सभागृहामध्ये विशेष करून बालिकांसाठी नवदुर्गा सन्मान आणि महिला जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर रेल्वे महाप्रबंधक निती सरकार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या दलजीत कौर जज, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे, सौ.स्नेहल कोकाटे, पोलीस उपअधिक्षक गृह डॉ.अश्र्विनी जगताप, इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुशीलकुमार नायक यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी उपस्थित महिलांपैकी विविध क्षेत्रामध्ये जबर काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पुढे बोलतांना शशिकांत महावरकरांनी विद्यार्थींनींना अनेक प्रश्न विचारले. त्यात राणी लक्ष्मीबाई यांनी काय केले. याबद्दल माहिती विचारली तेंव्हा एका बालिकेने सांगितले की, त्यांनी इंग्रजांविरुध्द लढा दिला असे सांगितले. या प्रश्ना उत्तर देण्यासाठी बालिकांना लागलेल्या वेळेबद्दल महावरकर यांनी सांगितले की, तुम्ही स्वत: कष्ट केल्याशिवाय हे सर्व कळणार नाही. भारतात महिलांना शिक्षण द्यावेच लागते हा मुद्दा घेवून घडलेल्या महिला सावित्रीबाई फुले या आहेत. त्यांनीच महिलांसाठी शिक्षणाचे दार उघडले होते. आपल्या जीवनात भारत देशात विविध क्षेत्रात काम केलेले महापुरूष आणि महिला यांच्या चरित्रांचा अभ्यास करा म्हणजे आपल्याला काय करायचे आहे, ते कसे मिळवता येईल यासाठी मार्ग सापडले. सोबतच महावरकर यांनी सांगितले की, आज तुम्हाला गुरूजींनी चला म्हटले आणि तुम्ही आलात. त्यावेळेस बालिकांमध्ये हास्यापिकला. तसेच न करता तुम्ही आपण कोणत्या कार्यक्रमाला जात आहोत त्याची माहिती जमा करा जेणे करून तुम्हाला त्या कार्यक्रमाचा विषय समजेल त्यातून तुम्हाला लवकरच सिध्दी प्राप्त करता येईल.
रेल्वेच्या महाप्रबंधक निती सरकार यांनी रेल्वेतून प्रवास करतांना काय-काय समस्या येवू शकतात त्यावेळी आपल्यासोबत कोणी घरातील दुसरा मोठा व्यक्ती नसेल तर आपण त्या त्रासासोबत स्वत:ला कसे वाचवायचे याबद्दल माहिती दिली. रेल्वेत होणाऱ्या त्रासासाठी रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वेमध्ये जनतेसाठी उपलब्ध असलेल्या टोल फ्री मोफत क्रमांकाची माहिती देवून येथून माहिती घेण्यास सांगितले.

यानंतर भरोसा सेलमध्ये काम करणाऱ्या पोलीस उपनिरिक्षक प्रियंका आघाव यांनी बालक आणि बालिकांच्या मदतीसाठी तयार करण्यात आलेल्या 112 या ऍपबद्दल माहिती देतांना सांगितले की, गुलगल प्ले स्टोअरमधून 112 हे डाऊनलोड करून घेतल्यानंतर कोणत्याही त्रासासाठी त्यावर कॉल करता येतो. त्यांनी बालक-बालिकांसोबत होणाऱ्या दुरव्यवहाराची अनेक उदाहरणे सांगितली. सोबतच बालिकां समजेल अशा शब्दात आपल्यासोबत काय वाईट घडते त्याला कसे समजून घ्यावे आणि त्याचा विरोध कसा करावा याचीही माहिती दिली. आपल्यासोबत घडलेला प्रकार आई-वडीलांना सांगितला तर ते आपल्याला रागावतील ही भिती कधी बाळगु नका कारण 112 वर दिलेली माहिती आणि देणाऱ्याचे नाव हे नेहमी गुप्त ठेवले जाते. ते कोणालाच कधी सांगितले जात नाही म्हणून आपल्यासमोर आलेल्या परिस्थितीला सात देण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत असा सल्ला दिला.याप्रसंगी पोलीस उपनिरिक्षक स्नेहा पिंपरखेडे यांनी बालिकांसोबत होणाऱ्या दुरव्यवहार समजून सांगितले. ज्या त्रासांमुळे बालिकांच्या जीवनात अनेक प्रसंग वाईट पध्दतीने येतात आणि त्या वाईट प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकत आपण आपली कशी तयार करायची याबद्दल सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी उपनिरिक्षक प्रणिता बाभळे यांनी हनी ट्रॅप कसा होतो त्यात बालिकांना आणि युवतींना कसे फसवले जाते याबद्दल सविस्तर सादरीकरण केले. पोलीस उपनिरिक्षक दामिनी ननवरे यांनी ऑनलाईनमध्ये येणाऱ्या जाहिरातील आणि त्यातील कामकाजाची फसवणूक पध्दतशिरपणे समजेल अशा पध्दतीने उपस्थितांसमोर मांडली.याप्रसंगी वाहुतक विभागाने छोट्या-छोट्या चित्रपटांच्या माध्यमातून जीवनात होणारे रस्त्यांवरील अपघात आणि त्यातून होणारा त्रास आणि त्यातून वाचण्याची पध्दत समजून सांगितली.
नवदुर्गा सन्मान आणि महिला सुरक्षा जनजागृती या कार्यक्रमात शहरातील अनेक शाळा व महाविद्यालयातील युवतींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. हा कार्यक्रम शहरातील कुसूम सभागृहात पार पडला.
