नांदेड(प्रतिनिधी)-एच.डी.कंपनीचा मालक आहे असे सांगून एका व्यक्तीने आपल्या बॅंक खात्यावर 5 लाख 40 हजार रुपये घेतले खरे परंतू ट्रॅक्टर काही दिला नाही. याबाबत अर्धापूर पोलीसांनी फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला.
ज्ञानेश्र्वर बाबूराव आढाव रा.गणपूर ता.अर्धापूर जि.नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.24 एप्रिल 2022 ते 24 जून 2023 दरम्यान निखेरसिंह होशियारसिंह रा.जीवनपुर जिनेवाला या व्यक्तीने मी एच.डी.कंपनीचा मालक आहे.तुम्हाला एचएमटी कंपनी ट्रक्टर खरेदी करून देतो असे सांगून कंपनीचे खाते क्रमांक 32230283596 आणि आयएफएससी कोड क्रमांक सीडीई एसबीआयएन 0011849 या आधारावर वेगवेगळ्या तारखांना एकूण 5 लाख 40 हजार रुपये खात्यात टाकायला लावले. परंतू ट्रॅक्टर मिळाला नाही. यानंतर ज्ञानेश्र्वर आढाव यांनी दिलैल्या तक्रारीनुसार अर्धापूर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 406, 34 नुसार गुन्हा क्रमांक 387/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक हनमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार बोईनवाड हे करत आहेत.
एचएमटी कंपनीचे ट्रॅक्टर देतो म्हणून 5 लाख 40 हजारांची फसवणूक