प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या जिल्हा अंमलबजावणी समितीची बैठक संपन्न

नांदेड (जिमाका)  – पीएम विश्वकर्मा योजनेत शहरी व ग्रामीण भागातील पात्र कारागीर यांनी सीएससी सेंटरवर नोंदणी करावी. या योजनेत नोंदणीसाठी कोणतीही फी आकारली नसून नोंदणी विनामुल्य आहे. या नोंदणीसाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, राशनकार्ड व बँक खाते तपशील आवश्यक आहे. तरी शासनाच्या या महत्वकांक्षी योजनेचा पात्र कारागीरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या जिल्हा अंमलबजावणी समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा अग्रणी बँकेचे अनिल गचके, सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक प्रविण खडके यांची उपस्थिती होती. या बैठकीचे सुत्रसंचालन सदस्य सचिव तथा प्र. जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी संजय सारंगधर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *