नांदेड(प्रतिनिधी)-पाच दिवसांच्या अंतरात लेबर कॉलनीमध्ये घडलेल्या 3 लाख 30 हजार 600 रुपये किंमतीच्या चोरीचा गुन्हा 16 ऑक्टोबर रोजी दाखल झाला आहे.
समीर आसिफ मोहम्मद जिलानी परदेशी हे बांधकाम कंत्राटदार आहेत. ते लेबर कॉलनीमध्ये राहतात. ते आणि त्यांचे कुटूंबिय 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता लातूरला गेले होते. ते कुटूंबिय 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता परत आले. या दरम्यान ते घरात नसल्याची माहिती याबद्दल रेखी करून कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घरफोडले आणि त्यातून सोन्याचे लांब गंठण, मिनी गंठण, ब्रेसलेट, पाटल्या, गंठ्या, कानातील असा एकूण 14 तोळे सोने असा एकूण 2 लाख 80 हजारांचा ऐवज तसेच प्लॅटीनमचे नेकलेस, चांदीची अंगठी आणि रोख रक्कम 10 हजार असा 3 लाख 30 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 454, 457, 380 नुसार गुन्हा क्रमांक 337/23 दाखल केला आहे. शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनात गुन्हा शाखेचे प्रभारी पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे अधिक तपास करीत आहेत.
लेबर कॉलनीमध्ये झाली 3 लाख 37 हजारांची चोरी