दलित पँथर ऑफ इंडिया पुन्हा स्थापन करण्याबाबत लवकरच निर्णय घेणार
मुंबई – दलित पँथरचा संघर्ष हा सामाजिक समतेसाठी संघर्ष होता. डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातील भारत साकार करण्यासाठी दलित पँथरचा संघर्ष होता. मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य करुन ओ.बी.सी. समाजाला आरक्षण मिळवुन देण्यासाठी दलित पँथरने संघर्ष केला. मराठा समाजातील गरिबांना आरक्षण मिळाले पाहिजे यासाठीही दलित पँथरने संघर्ष केला. भूमिहिनांसाठी, झोपडपट्टीवासीयांसाठी, दलितांच्या न्याय हक्कासाठी दलित पँथरने प्रचंड संघर्ष केला. भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांसाठीही दलित पँथरने संघर्ष केला. असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.
औरंगाबादमधील आमखास मैदानात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारोहात ना.रामदास आठवले उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी दलित पँथरमध्ये काम केलेल्या ज्येष्ठ पँथर कार्यकर्त्यांचा ना.रामदास आठवले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी दलित पँथरमध्ये काम केलेले ज्येष्ठ नेते दिवंगत प्रितमकुमार शेगांवकर , माजी आमदार दिवंगत टी.एम. कांबळे आणि ज्येष्ठ नेते यशपाल सरवदे या दिवंगत पँथर नेत्यांचा सन्मान त्यांच्या कुटुंबियांनी स्विकारला.ज्येष्ठ नेते पँथर गंगाधर गाडे यांचाही सन्मान यावेळी जाहीर करण्यात आला. नांदेडचे विजय सोनवणे, बालाजी धनसरे, चंद्रकांत ठाणेकर,एस.एम. प्रधान (मरणोत्तर), नारायणगायकवाड(मरणोत्तर) यांचाही सन्मान यावेळी जाहीर करण्यात आला.मेळाव्याच्या प्रवेशद्वारास दिवंगत प्रितमकुमार शेगांवकर यांचे नाव देण्यात आले होते तसेच ज्येष्ठ नेते गंगाधर गाडे यांचेही नाव मेळाव्याच्या प्रवेशद्वारास देण्यात आले होते.
दलित पँथर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमीत्त दलित पँथरच्या 50 वर्षाच्या इतिहासाचे सिंहावलोकन करताना मुळ दलित पँथर ही संघटना केवळ 3 वर्ष चालली असली तरी जगभर दलित पँथरने आपली नोंद केली. दलित पँथर क्रांतीचा विचार होता. मात्र त्या विचाराला क्रांतीचे, लढयाचे, आंदोलनाचे आणि लोकचळवळीचे राज्यव्यापी संघटनेचे स्वरुप भारतीय दलित पँथरने मिळवून दिले. भारतीय दलित पँथरने तरुणांना स्वाभिमान आणि सामाजिक क्रांतीचा लढाऊबाणा दिला. भारतीय दलित पँथर महाराष्ट्राच्या गावागावात आणि संपूर्ण देशात पोहचली. त्यामुळे दलित पँथरला जिवंत ठेवण्याचे काम भारतीय दलित पँथरने केले. असे मत ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
डाँ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा 16 वर्ष भारतीय दलित पँथरने लढविला. अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी भारतीय दलित पँथरची आक्रमक शैली आजही तरुणांना हवीहवीशी वाटत आहे. भारतीय दलित पँथरने गावागावात दलित मराठा वाद मिटवुन सामाजिक एकोपा निर्माण केला. त्यामुळे आता सामाजिक संघटना म्हणून भारतीय दलित पँथरची पुन्हा उभारणी करण्याचा विचार आम्ही करीत आहोत.त्यासाठी येत्या दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी साहित्यीक आणि विचारवंताची लोणावळा येथे बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे समाजात पुन्हा भारतीय दलित पँथरचे वादळ उभे करण्याचे विचाराधीन असल्याचे ना. रामदास आठवले यांनी जाहीर केले.
यावेळी रिपाइंचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम हे या मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत अर्जुन डांगळे, ज्येष्ठ साहित्यीक शरणकुमार निंबाळे, ज्येष्ठ साहित्यीक ऋषीकेश कांबळे, रिपाइंचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, पप्पु कागदे, ज्येष्ठ नेते दिलीप जगताप, मिलींद शेळके, अॅड.ब्रम्हानंद चव्हाण, दौलत खरात, किशोर थोरात मुख्य संयोजक संजय ठोकळ, नागराज गायकवाड, श्रीकांत भालेराव, डी.एम. चव्हाण,दयाल बहादूर; परशुराम वाडेकर, डि.एन. दाभाडे,विजय सोनवणे, चंद्रकांत चिकटे, अनिल गांगुर्डे,राजा ओवाळ, सिध्दार्थ भालेराव, भाष्कर रोळे, संजय बनसोडे, विजय मगरे, राकेश पंडित, दिलीप पाडमुख, गौतम काळे,मिलिंद शिराढोणकर, सचिन सांगवीकर आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते.