नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख माधव पावडे यांच्याविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 507 प्रमाणे शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बाबासाहेब शिवाजीराव जोगदंड (47) व्यवसाय शेती रा.निळा ह.मु.गोकुळनगर नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.18 ऑक्टोबर रोजी माधव पावडे यांनी बाबासाहेब जोगदंड यांना फोनवरून बोलतांना तु बबन थोरात यांच्याविरोधात फेसबुकवर पोस्ट का टाकली अशी विचारणा करत वारंवार फोन करून जिवे मारण्याची धमकी दिली. या जबाबानुसार शिवाजीनगर पोलीसांनी 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 16.55 वाजता स्टेशन डायरी नोंद क्रमांक 20 नुसार माधव पावडे यांच्याविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 507 नुसार गुन्हा क्रमांक 431/2023 दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार शेळके यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाविरुध्द गुन्हा दाखल