
आज पोलीस हुतात्मा दिनी नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नांदेड पोलीस अधिक्षक पदाचा 365 दिवस पुर्ण केला. उद्या 22 ऑक्टोबर(दुर्गाअष्टमीच्या शुभमुर्हतावर) त्यांच्या सेकंड इनिंगची सुरुवात होणार आहे. आपल्या स्वत:च्या मेहनतीवर मिळवलेल्या पदानंतर त्यांनी आज भारतीय पोलीस सेवेत प्रवेश केलेला आहे. मागच्या कालखंडाऐवजी नांदेड जिल्ह्याच्या 365 दिवसांमध्ये त्यांनी केलेले काम पाहिल्यानंतर अपर पोलीस महासंचालक डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांनी त्यांच्याबद्दल वापरलेले, ” कोकाटे इज एक्सलंट लिडर’ हे शब्द खरे आहेत असेच म्हणावे लागेल.

मागील वर्षी 22 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांनी नांदेड जिल्ह्याचा कार्यभार सांभाळला आणि गेली 365 दिवस त्यांनी केलेली मेहनत वर्णन करायची असेल तर, जर तुम्ही काट्यावर लक्ष केंद्रीत केेले तर फुलांची प्रशंसा करू शकत नाही. पण तुम्ही फुलांकडे प्रथम लक्ष केंद्रीत केले तर काटे जास्त टोचणार नाहीत. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण कोकाटे यांनी लोकांच्या सदगुणांवर लक्ष केंद्रीत करून दुर्गुंणाना निष्काशित केले. गेलेल्या क्षणांसाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणांसाठी मनमोकळे हात पुढे करून मागील पेक्षा चांगली कामे केली. खरे तर माणसाचा खरा मित्र दु:ख आहे. कारण जोपर्यंत तो सोबत असतो. ते दु:ख आयुष्यातील खुप धडे शिकवतो. असेच धडे शिकत त्यांनी स्वत:साठीच नव्हे तर नांदेड जिल्ह्याच्या जनतेसाठी सुध्दा सुख शोधले.

या एक वर्षात त्यांनी आपल्या सहकारी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांसोबत केलेली वागणुक अत्यंत संयमी, प्रेमळ कधी-कधी लाल मिर्च्यांसारखी वापरल्यामुळे नांदेड जिल्ह्याचा त्यांचा 365 वा दिवस पुर्ण झाला. यादरम्यान काही राजकीय अडचणींपण आल्या. पण त्या अडचणी श्रीकृष्ण कोकाटे यांनी एवढ्या हिम्मतीने पेलल्या की, त्याबद्दल त्यांच्यावर कधीच कोणी आरोप करू शकला नाही. जीवन सुध्दा एक पाण्याचा प्रवाह आहे. समुद्र गाठायला त्या पाण्याला खाचखळगे पार करावेच लागतात. ते पार करत असतांना त्यांनी आज भारतीय पोलीस सेवेतील पद प्राप्त केले आहे. हे प्रशंसनियच आहे ना! जीवनात माणसे बदलतात, वेळ बदलतो पण आयुष्य कोणासाठी थांबत नाही. आयुष्याचे वैशिष्ट हे बदल आहे आणि हा बदल बऱ्याच जणांना कळत नाही. पण श्रीकृष्ण कोकाटे यांनी हा बदल आत्मसात केला आणि आपल्या पोलीस सेवेला न्याय देतांना कोणतीच कमरता ठेवली नाही. त्यांच्याकडे जाणाऱ्या प्रत्येक फिर्यादीचे शब्द ते शांतपणे ऐकून घेतात आणि उत्तर मात्र स्वत:चेच देतात. हे खरे पण आहे यात चुक काही नाही. कारण सांगणारा माणुस नांदेडचा असतो, ज्याच्याबद्दल सांगतो तो नांदेडचा असतो म्हणून माझ्यावतीने सत्याला साथ मिळावी किंबहुना माझा वापर करून कोणी आपला बदला काढू नये याचे लक्ष ठेवूनच श्रीकृष्ण कोकाटे हे स्वत:चे स्वतंत्र उत्तर देतात ही त्यांच्यातली विशेषता: आहे. संघर्ष हे आमंत्रण असते ते निसर्गाने दिलेले असते आणि जो संघर्ष स्विकारतो तोच पुढे जातो आणि या संघर्षात शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेले हे सुंदर उत्तर असते आणि संयम हे परिस्थितीला दिलेले प्रतिउत्तर असते. याच शब्दांप्रमाणे श्रीकृष्ण कोकाटे वागतात आणि आपला चढता आलेख वरच नेत असतात. त्यांच्या पोलीस सेवेच्या जीवनात त्यांच्या पत्नी सौभाग्यवती स्नेहल यांचाही सहभाग मोठा आहे . कारण बाहेर 100 समस्यांना तोंड देवून घरी गेल्यानंतर त्यांना नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी सौ.स्नेहल यांची आहे आणि त्या सुध्दा आपल्या योगेश्र्वराला तेवढ्याच हिंमतीने मदत करतात. म्हणूनच म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरूषामागे एक स्त्री असते.
आपल्या एक वर्षाच्या कालखंडात श्रीकृष्ण कोकाटे यांनी दर मंगळवारी आपल्या पोलीस अंमलदारांसह नांदेड शहरात सकाळच्या थंडवातावरणात दौड केली. त्या दौडचा फायदा असा झाला की, पोलीस गरज असलेल्या वेळेस, निरव शांतते रस्त्यावर फिरते. त्यामुळे गुन्हेगारांवर आपोआपच वचक बसला. त्यामुळे सकाळच्या वेळेत होणाऱ्या चैनस्नेचिंग कमी झाल्या. त्यांच्या काळात लाखो रुपयांचे अनेक मोबाईल शोधून त्यांनी मालकांना परत दिले. जिल्ह्यातील बालकांसाठी आणि पोलीस बालकांसाठी विविध योजना सुरू करून त्यांना बक्षीसे जाहीर केली. जेणे करून आपल्या जीवनात त्यांना उत्साह मिळावा. काही गुन्हेगारांना त्यांनी अत्यंत प्रेमळ भाषेत दिलेली समज सार्वजनिक नसली तरी त्या गुन्हेगारांना नक्की माहिती आहे की, श्रीकृष्ण काय करू शकतात. त्यामुळे वचक तयार झाला. सोबतच घडलेले खून, दरोडे, चोऱ्या ह्या जवळपास पुर्णपणे उघडकीस आलेल्या आहेत. कारण त्यांनी नांदेड जिल्ह्याच्या प्रत्येक पोलीस ठाण्यातील प्रत्येक गुन्ह्यावर बारकाईने लक्ष केंद्रीत केले. जिल्ह्यात कोठेही समस्या आली तर जाण्यासाठी कधीच वेळ लावला नाही. त्यामुळे आमचे पोलीस अधिक्षक आमच्या मदतीला नेहमी तयार राहतात. ही भावना पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांमध्ये रुजत गेली. यामुळे ते सुध्दा चांगलेच काम करत आहेत. पोलीस अधिक्षकांनी कोणत्याही कारणासाठी आपल्या अधिकारी आणि अंमलदारांना वेठीला धरलेले नाही. परंतू चुकला असेल त्याला पुढच्या इनिंगमध्ये त्यांनी शिक्षा जरुर द्यावी अशी अपेक्षा आहे. कारण त्यांनी जर हे केले नाही तर चुकीचे काम करून समाजात पोलीसींग दाखवणाऱ्या पोलीसांची हिंम्मत वाढेल.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी बऱ्याच जागेच्या काही जणांना मुख्यालयात जमा केले होते. परंतू ते आजही त्याच ठिकाणी कार्यरत आहेत. याचा शोध श्रीकृष्ण कोकाटे यांनी घ्यावा आणि का ते तेथेच थांबले आहेत याचा माग काढून त्यावर योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे. श्रीकृष्ण कोकाटे यांना नांदेड जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळाली. त्यातील महत्वाची बाब अशी आहे की, दशम पातशाह श्री.गुरू गोविंदसिंघजी महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या या भुमीमध्ये त्यांना काम करण्याची संधी प्राप्त झाली. श्री गुरू ग्रंथ साहिबजीमध्ये वाक्य नमुद आहे , “जिसके सिर उपर तु स्वामी सो दु:ख कैसा पावे’ या आशिर्वादाप्रमाणे श्रीकृष्ण कोकाटे यांची उद्यापासून सुरू होणारी दुसरी इनिंग पुर्ण व्हावी अशी आमची विनंती गुरू महाराजांकडे आहे. अपेक्षा आमची अशी नाही की श्री.द्वारकादासजी चिखलीकरसारखा रेकॉर्डबे्रक कार्यकाळ पुर्ण करावा परंतू कायद्यात विहित असलेल्या, बदलींच्या नियमांमध्ये असलेल्या विहित कालखंडाप्रमाणे त्यांची दुसरी इनिंग पुर्ण करून त्यांनी 730 दिवस पुर्ण करावेत या शुभकामना…
