योेगेश्र्वरजी कोणाला देणार आहात एलसीबीची खुर्ची?

नांदेड(प्रतिनिधी)-योगेश्र्वराच्या सत्तेत काही दिवसांत होणाऱ्या बदलांमध्ये एका महत्वाच्या बदलात अत्यंत मोठा निर्णय योगेश्र्वरांना घ्यायचा आहे. तो दिवस सुध्दा सरदार पटेल यांच्या जयंतीच्यादिनी. सरदार पटेलांना लोहपुरूष हा किताब देशाने दिलेला आहे. परंतू नांदेडमधील लोखंडी पुरूषाचा क्रमांक तेथे लावून सरदार पटेलांच्या इभ्रतीला धक्का लागणार नाही याची दक्षता योगेश्र्वर नक्कीच घेतील. याशिवाय सुध्दा या घोडेबाजारात कोण-कोण आपले घोडे दामटत आहे या विचाराला अनुसरून योगेश्र्वरांनी हा निर्णय घ्यायचा आहे की एलसीबीच्या खुर्चीवर बसण्याची खरी पात्रता कोणाची आहे.
मागील 46 महिने झारशाहीसारखा ईतिहास घडवत सन्माननिय श्री.द्वारकादासजी चिखलीकर यांनी जो रेकॉर्ड तयार केला. तो रेकॉर्ड आता मोडणे अवघड आहे. पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिणा, संजय जाधव, विजयकुमार मगर, प्रमोद शेवाळे आणि सध्या श्रीकृष्ण कोकाटे असे पाच पोलीस अधिक्षक द्वारकादास चिखलीकरांनी एलसीबीच्या खुर्चीवर बसून पाहिले आहेत. पण विषयाला दुसराचा मोड सुरू झाला आहे म्हणून हा आता थांबवतोत आणि तो पुन्हा एकदा 31 ऑक्टोबरच्या पुर्वी लिहुत.
विहित वयाप्रमाणे द्वारकादास चिखलीकर 31 ऑक्टोबर रोजी मध्यांनंतर सेवानिवृत्त होणार आहेत.नवरात्रीच्या सुरूवातीपासून बऱ्याच पोलीस निरिक्षकांनी आपले देव पाण्यात ठेवून यासाठी प्रार्थना सुरू केली आहे. 28 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे. 29 ऑक्टोबरची सुट्टी आहे.30 ऑक्टोबर जागतीक बचत दिन आहे आणि 31 ऑक्टोबर सरदार वल्भभाई पटेल जयंती, राष्ट्रीय एकता दिवस आहे तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा स्मृती दिन आहे. अशा एवढ्या शुभ दिनी योगेश्र्वरांना एक मोठा निर्णय घ्यायचा आहे. एलसीबीच्या खुर्चीवर बसणारा अधिकारी पोलीस अधिक्षकांची प्रति स्वाक्षरी करीत असतो. त्यावेळी तयार झालेल्या कागदांमध्ये एक छोटीशी व्याकरणाची चुक पोलीस अधिक्षकांसाठी अवघड होवू शकते. म्हणून आम्हाला वाटते की, व्याकरण ज्ञान असणारा व्यक्ती त्या खुर्चीसाठी योग्य आहे.
याशिवाय पाण्यात देव ठेवलेल्यांमध्ये पोलीस अधिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब, श्री.उदयजी खंडेराय, श्री.विश्र्वंभरजी झुंजार आणि श्री.जगदीशजी भंडरवार यांचाही क्रमांक आहे. यामधील तीन अशोक घोरबांड, उदय खंडेराय आणि जगदीश भंडरवार हे तीन पोलीस अधिकारी नांदेड जिल्ह्याचे असल्याने पुढे येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमुळे यांची विकेट एकाच गोष्टीमुळे थांबू शकते आणि ती म्हणजे स्थानिक गुन्हा शाखेची खुर्ची. कारण स्थानिक गुन्हा शाखेला कार्यकारी शाखा या सदरात गणले जात नाही. आम्ही मोदकांची चर्चा समोर आणली.मागील हिशोब पाहिला तर जवळपास 10 हजार मोदकांचा प्रसाद या खुर्चीसाठी दिल्याची माहिती आहे आम्हाला. हे आमचे गणित चार वर्षापुर्वीचे आहे. नैसर्गिक नियमाप्रमाणे यात वाढ होणे अपेक्षीत आहे. परंतू योगेश्र्वर हा गणिताला थारा देणार नाहीत अशी आमची अपेक्षा आहे आणि आम्हाला खात्रीपण आहे. नांदेड जिल्ह्याचा कारभार चालवितांना त्या खुर्चीवर असणाऱ्या व्यक्तीची दृढ श्रध्दा फक्त योगेश्र्वरावर असली पाहिजे अशाच व्यक्तीला योगेश्र्वराने ती खुर्ची द्यावी.
नाही तर या स्पर्धेमध्ये असेही काही अधिकारी आहेत ज्यांनी संतांना सांगितले आहे की, तुमच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यांवर असा ढाग लावील की तो तुम्ही जिवंत असेपर्यंत धुतला जाणार नाही. एकदा आयजी साहेबांच्या घराची एक भिंत बाजुच्या भुखंडात काम चालु असतांना अपघाताने पडली. आय.जी. साहेबांनी ती पडलेली भिंत दुरूस्त करून घेण्यासाठी सांगितली. त्याही वेळेस एक म्हैस आणि त्या म्हशीसाठी लागणारी चाऱ्याची कुटी मशीन त्या अधिकाऱ्याने वसमतपेक्षा पुढे पाठविण्याचा आदेश दिला. पण देणाऱ्यांनी तिथे आम्ही नेणार नाही असा निर्वाळीचा सल्ला दिला तेंव्हा त्यांच्या जवळच्या एका नातलगाने नांदेडला येवून ती म्हैस आणि ती कुटी मशीन घेवून गेला आहे.योगेश्र्वर अशा व्यक्तींना तर ती जागा देणार नाहीत.
योगेश्र्वरांसमोर वास्तव न्युज लाईव्हच्यावतीने विनंती आहे की, सर्वसामान्य माणुस जो भारतीय संविधानामध्ये सर्वात मोठा मानला गेला. त्या सर्वसामान्य माणसाचे भले करण्यासाठी जो माणुस झटेल त्याला ती खुर्ची द्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *