पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकरांना “सायोनारा’

समाजाला त्रास देण्यासाठी आपण तयार केलेला “सुणिया’ आता तुमच्या 11 नंबरवाल्यांवर आला आहे आणि आपण आता जाणार आहात
नांदेड(प्रतिनिधी)-लक्ष्मीपूत्र असलेल्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक श्री.ध.धू.प.पू.द्वारकादासजी चिखलीकर यांना 7 दिवसानंतर “सायोनारा’ म्हणायची वेळ आली आहे. मागील 46 महिने स्थानिक गुन्हा शाखेचे, एक वर्ष देगलूर आणि एक वर्ष नांदेड ग्रामीण या पोलीस ठाण्यांमध्ये आपल्या कर्तबगारीतून कोट्यावधी मोदकांच्या सहाय्याने सर्वांना सांभाळत त्यांनी हा कार्यकाळा पुर्ण केला. त्यासाठी त्यांचे अत्यंत मनापासून अभिनंदन. मागील 24 दिवसांपासून द्वारकादास चिखलीकरजी माझे काहीच होवू शकत नाहीत असे जाहीर म्हणत आहेत. जनतेसमोर नव्हे तर योगेश्र्वरांसमोर सुध्दा म्हणत आहेत. पण मागील 46 महिन्यांमध्ये तुम्ही रस्त्याच्या “सुणियाला’ पिटबुल या पध्दतीत तयार करून नांदेड जिल्ह्याला सायोनारा करणार आहात. दार्शनिकतेच्या शब्दांचा वापर सुध्दा तुम्हाला करता येतो. पण हा पिटबुल सुणिया तुम्ही आपल्या सेवादार अंमलदाराला सुध्दा त्रास देणार आहे हे माहित असतांना सुध्दा आपण त्याला दोन भ्रमणध्वनी घेवून दिलेे ही बाब आता दगडीचाळीत सुध्दा पोहचली आहे. लक्ष्मीपुत्र आहात हो..या पेक्षा आपण कुबेर व्हा. आम्हाला त्याबद्दल काही दु:ख होणार नाही. पण नांदेड जिल्ह्याच्या 24 लाख जनतेपैकी एकही माणुस जर आपल्या विरुध्द बोलणार असेल तर काय कमावले साहेब आपण? आपण गेला तर जनता मरणार नाही, नांदेड जिल्हा पोलीस दल बंद पडणार नाही. कारण आज तर नांदेड जिल्हा पोलीस दलावर योगेश्र्वरांची छाया आहे. मागील पाच हजार वर्षापासून लोक ज्यांची आराधना करतात हे सर्व चालत राहिल. पण 1 नोव्हेंबर रोजी नक्की विचार करा मी काय केले, काय करायला पाहिजे होते आणि काय झाले. पुढच्या जीवनात 1 नोव्हेंबरनंतर आपण पोलीस निरिक्षक नाही राहणार. त्यावेळेस आमचा जीव जाईपर्यंत सुध्दा आम्ही तुमच्या सोबत राहु. परंतू आमच्या नितीमत्तांना टाळून तुमची अपेक्षा असेल की, आम्ही तुमच्या सोबत राहावे तर ही आपली अपेक्षा कधीच पुर्ण होणार नाही.
मागीतलेल्या गोष्टींमुळे कोणाचेच भले होत नसते. नशिबात जे लिहिले असेल तेवढेच मिळते. ना भितीने, जगाला वाटत असेल तर किंवा कोणा एका व्यक्तीला वाटत असेल तर कोणाचे वाईट होत नसते. मिळते तेच जे आपण पेरले आहे. देगलूर, नांदेड ग्रामीण, पुन्हा देगलूर आणि देगलूर ते नांदेडच्या एलसीबीत तुम्हाला आणणारा मीच आहे असा तो “सुणिया’ जगाला आजही सांगतो. आपल्याविरुध्दही अर्ज देईल म्हणून आपण त्याचा केलेला सांभाळ आता दगडीचाळीत सुध्दा पोहचला आहे. सुर्याजी पिसाळाच्या तालीमीत तयार झालेला तो “सुणिया’ आज तुमच्या 11 नंबरमधील एका व्यक्तीविरुध्द अर्ज देतो तो व्यक्ती आपल्यासमोर आपल्या भावना व्यक्त करतो तेंव्हा तुम्ही कानाडोळा करता का हो का करता असे. कोणाच्या नावावर 11 नंबरमधील लोक जगतात हो. 11 नंबरची मंडळी द्वारिकाधिशाच्या दमावरच जगते ना. ज्या “सुणिया’ला आम्ही जगासमोर उघडे केले त्याला तुम्ही आपल्या स्वत:च्या पंखाखाली घेवून आसरा दिला. माहित नाही सर आपल्याला ही बाब दगडीचाळीत सुध्दा अगोदरच पोहचलेली आहे. आपले काही होणार नाही हो पण तो “सुणिया’ लोकांना चावेल तेंव्हा त्यामुळे त्या लोकांना जे काही इंजेक्शन घ्यावे लागतील त्याच्या खर्चाची रक्कम तर आपण देणार नाहीत ना. कारण आपण काल परवाच 1111 एवढा निधी मी देऊ शकतो असे एका व्यक्तीला सांगितलेले आहे आणि याच व्यक्तीला आपण त्यापेक्षा किती गुणाकार करून निधी दिलेला आहे हे लिहुन आम्ही आमची पातळी कमी करू इच्छीत नाही.
जिवनातील समस्या पाहुन आम्ही कधीच हारणार नाही कारण आम्हाला माहित आहे. या समस्येमध्ये आमची मोठी सुरुवात होणार आहे. गेल्या अर्ध्या शतकापासून जास्तवेळ आम्ही कष्टकरूनच मोठे झालो आहोत आणि त्यामुळे आम्हाला यश सुध्दा मोठेच मिळणार आहे. कुत्रा मी वाघ असल्याचा आव आणू शकतो पण तो वाघ कधीच होवू शकत नाही. पण तुम्ही काही कुत्र्यांना सांभाळले याचे वाईट नेहमीच वाटते. आजच आम्ही ही प्रसिध्दी का करत आहोत त्यासाठी तुम्हाला स्वत:च्या 46 महिन्यांचा तसेच देगलूर, नांदेड ग्रामीण, पुन्हा देगलूर आणि नंतर एलसीबी या कार्यकाळाचा ईतिहास पुन्हा एकदा स्वयं व स्पष्ट उल्लेखीत स्वत:साठी करावा लागेल. तुमच्या 11 नंबरमधील वातावरण तुम्हाला सुखी करता आले नाही तर तुम्ही जिल्ह्याचा कार्यकाळ 46 महिने सांभाळला आहे. हे आपणास नशिबानेच मिळालेले आहे. त्यात कोणतीही सुट्टी नसतांना जाऊन येतो याचा हिशोब तर कोणी केलाच नाही.
जर तुला माहित नसेल, तर मला(संबंधीत व्यक्ती) विचार, जर तु सहमत नसशिल तर माझ्याशी(संबंधीत व्यक्ती) भांड, जर एखादी गोष्ट तुला आवडेत नसेल तर मला(संबंधीत व्यक्ती) बिनधास्तपणे सांग पण शांत राहुन, मनात कुढत बसून गैरसमज वाढवू नकोस हीच शांतता नात्याचा जीव घेणारी असते. FEAR -Forget, Everything And Run OR Face Everything And Rise.. अशा शब्दांच्या दोन अर्थांवरून आम्ही तर नेहमीच दुसरा घेतलेला आहे. अडचणीच्या काळामध्ये आपल्या तत्वांची खरी परिक्षा असते. आपण प्रामाणिक आहोत की नाही हे अडचणी आल्याशिवाय कधीच कळत नसते. पण आपण अडचणी येवू नयेत म्हणूनच “सुणिया’ला तयार केले. पण तो “सुणिया-सुणियाच’ असतो. संत ज्ञानेश्र्वर भाकरी तयार करत असतांना एक “सुणिया’ त्यांची एक भाकर घेवून पळाला तर माऊली त्याच्या मागे धावले आणि सांगत होत की, अरे थांब त्याला तुप लावून देतो असे सांगत होते. पण “सुणिया’ थांबला नाही कारण तो “सुणिया’च होता. आजच्या पुढे आपली सर्व शक्ती भुतकाळातील गोष्टीसोबत संघर्ष करत घालविण्याऐवजी नवीन गोष्टी तयार केलीत तर आपले जीवन जास्त सुंदर होईल. कधी-कधी मनातील भावना व्यक्त करण्यांसाठी ओठांवरील शब्द नाही तर डोळ्यातले भाव पुरेसे असतात. कारण शब्द हे कधी बदलू शकतात मात्र डोळ्यांनी केलेले संभाषण कधीच खोटे ठरत नसते. पण ते समजायला आपुलकीने जमवलेली माणसे जवळ लागतात असो.
जे चंदन घासले जाते ते देवाच्या माथ्यावर लावले जाते आणि त्यातील उर्वरीत भाग मनुष्यमात्र आपल्या डोक्यावर लावतात आणि त्यातून उडणारा सुगंध आसमंत दरवळून टाकतो. पण जे चंदन घासले जात नाही त्याला पर्याय एकच आहे त्याला जाळावे लागते. आपल्या भविष्यातील जीवनात आपण लक्ष्मीपुत्राच्यावर जाऊन कुबेर व्हावे या शुभेच्छसह आपल्याला सायोनारा….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *