नांदेड(प्रतिनिधी)-दसऱ्या पहाट होण्याअगोदर एका 34 वर्षीय पुत्राने आपल्या आईचा खून करून विचित्र कांड घडविले आहे. हा प्रकार लोहा तालुक्यातील मौजे बेलवाडी शिवारात घडला. मारेकरी पुत्राला माळाकोळी पोलीसांनी ताब्या घेतले असून न्यायालयाने त्याला 26 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
जिल्हा परिषद शाळा चित्रा तांडा येथे शिक्षक असलेले बालाजी एकनाथ केंद्रे (54) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा नरसिंह बालाजी केंद्रे (34) याने 24 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 2.30 वाजेच्यासुमारास त्यांच्या शेतातील घरात आपली आई गंगाबाई बालाजी केंद्रे (50) हिला तु माझ्या नावावर जमीन कमी केली. तसेच माझ्या नोकरीसाठी काही प्रयत्न करीत नाहीस, नोकरीसाठी पैसे खर्च करत नाहीस, मी बेकार आहे म्हणून माझे लग्न होत नाही हा राग मनात धरुन गंगाबाई झोपेत असतांना लोखंडी कत्तीने कालावर, चाळ्यावर, छातीवर, चेहऱ्यावर, हातावर असे अनेक वार करून त्यांचा खून केला. गावकरी सांगतात गंगाबाईचा स्वभाव हा अत्यंत खेळीमेळीचा होता परंतू त्यांचे दुर्देव की, त्यांच्या मुलानेच त्यांचा खून केला. माळाकोळी पोलीसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 302 प्रमाणे गुन्हा क्रमांक 161/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास माळाकोळीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार हे करीत आहेत.
दसऱ्याच्या दिवशी दुपारी माळाकोळी पोलीसांनी आईचा मारेकरी नरसींह केंद्रे यास न्यायालयात हजर केले असतांना न्यायालयाने त्यास 26 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
कुपूत्राने आईचा खून केला; आता पोलीस कोठडीत