नांदेड(प्रतिनिधी)-धर्माबादच्या नवा मोंढा भागात 23 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हा शाखेच्या विशेष पथकाने धाड टाकून क्रिकेट जुगार चालविणाऱ्या एकाला पकडले आहे. हा ऑनलाईन सट्टा सट्टा अफगाणिस्तान व पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर सुरू होता.
नांदेड स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक श्री.द्वारकादासजी चिखलीकर यांना मिळालेल्या माहिती आधारे आपल्या पथकातील पोलीस उपनिरिक्षक डॉ.परमेश्र्वर चव्हाण, अत्यंत कठोर एएसआय संजय केंद्रे, धुरंधर पोलीस अंमलदार पद्मसिंह कांबळे आणि घुगे तसेच लेखणीचे कलाकार पोलीस अंमलदार मधुकर टोणगे यांना धर्माबादला पाठविले. त्या ठिकाणी पोलीसांनी मोठी जबरदस्त कार्यवाही करत अफगाणिस्तान व पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर सट्टा चालविणाऱ्या विष्णु विजय जोशी(27) रा.शिवाजीनगर धर्माबाद यास पकडले. त्याच्याकडील 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि 6 हजार रुपये रोख रक्कम जप्त करून धर्माबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर विष्णु विजय जोशीवर महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेची धर्माबादमध्ये क्रिकेट सट्ट्यावर धाड