
नांदेड(प्रतिनिधी)-विजयादशमी निमित्त आज शहरात नवा मोंढा, गाडीपुरा, सिडको आदी भागात रावण दहन करण्यात आले. सकाळपासूनच गोविंदाच्या गजराने आसमंत दुमदुमले.
आज नवरात्रीच्या शेवटचा दिवस विजयादशमी. या दिवसाला वेगवेगळे अनंत महत्व आहे. नवरात्रांच्या नऊ दिवसात आई दुर्गा ही सर्वांची आराध्य दैवता आहे. भगवान व्यंकटेश अर्थात गोविंदा हा सर्वांची श्रध्दा आहे. सकाळी 4 वाजेपासूनच व्यंकटेश मंदिरांमध्ये लोकांनी रांगा लावून आशिर्वाद घेतला. त्यानंतर सायंकाळी गाडीपुरा येथील बालाजी मंदिरातून रथ यात्रा निघाली. ती जुना मोंढा, शास्त्री मार्केट ते परत मंदिराकडे गेली. तसेच बालाजी मंदिर येथून सुध्दा रथ यात्रा निघाली ती तेथून थेट वजिराबाद चौक आणि परत बालाजी मंदिर अशी चालली. अनेक ठिकाणी रथ यात्रेची आरती करण्यात आली. गाडीपुरा आणि सिडको भागात रावण दहन करण्यात आले. हे रावण दहन पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होते.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या नेतृत्वात पोलीस दलातील असंख्य अधिकारी आणि असंख्य पोलीस अंमलदार, गृहरक्षक दलाचे जवान यांनी मेहनत घेवून कोणत्याही धार्मिक कार्यक्रम अशांतता होणार नाही यासाठी भरपूर मेहनत घेतली.