नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीसांकडे दाखल झालेल्या एका 13 लाख 80 हजार रुपये फसवणूकीच्या प्रकरणात आज एका आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. तर दुसरा अटक आरोपी घेवून इतवारा पोलीस पथक बिहार राज्यात गेले आहे.
21 सप्टेंबर 2021 रोजी उमरी येथील शेख कलीमोद्दीन शेख बशीर यांनी तक्रार दिली की, एक्सबॉन्ड नावाच्या कंपनीमध्ये पैसे गुंतवले. त्यांना गुजरात येथे बोलावून एका हॉटेलमध्ये झालेल्या मिटींगमध्ये पैसे दामदुपट कसे होतात याचे आमिष दाखविण्यात आले. तुमची रक्कम 20 आठवड्यात दुप्पट होईल असे आमिष दाखवले. ट्रेडविंग मल्टीसर्व्हिसेस प्रा.लि.चे संचालक नागमणी यादव, शेख साखरे यांच्याशी नेहमी फोनवर बोलून यांच्याशी एकूण 13 लाख 80 हजार रुपयांची गुंतवणूक या कंपनीत करण्यात आली. परंतू पैसे काही दामदुप्पट झाले नाहीत. तेंव्हा दि.21 सप्टेंबर 2021 रोजी गुन्हा क्रमांक 232/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 406, 34 सोबत महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 च्या कलम 3 नुसार गुन्हा दाखल झाला.
2 वर्ष या गुन्ह्यात काहीच घडले नाही. परंतू इतवारा उपविभागात पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक आणि इतवारा पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक संतोष तांबे आल्यानंतर या गुन्ह्याच्या तपासाला वेग आला आणि इतवारा पोलीस पथकाने नागमणी सहजानंद प्रसाद (38)रा.बिहार राज्य यास पकडून आणले. त्याची 12 ऑक्टोब ते 27 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी होती. या दरम्यान पोलीस पथकाने जयेश रामभाई सिंधवा यास पकडले.पोलीसांच्या तपासात ट्रेडविंग कंपनी कशी बोगस आहे याचे अनेक पुरावे जमा करण्यात आले. त्यांच्या बॅंक खात्यांची तपासणी झाली आणि आता सध्या तिसरा आरोपी शोधण्यासाठी इतवारा पोलीस पथक गेले आहे.
अशाच प्रकारच्या भुलथापा देवून लोकांच्या होणाऱ्या फसवणूकीबाबत वास्तव न्युज लाईव्हने अनेकदा जागरुकतेच्या संदर्भाने भरपूर लिखाण केले आहे. परंतू जनतेमध्ये जागरुकता येत नाही आणि अशीच फसवणुक होत असते. यापुढे तरी जनतेने कोणतीही ओळख नसतांना, कंपनीबद्दल सविस्तर माहिती नसतांना अशा गुंतवणूकी करू नये. 20 आठवड्या जर पैसे दामदुपट होणार असते तर जगात सुरू असलेली अर्थव्यवस्थेची भांडगड संपूनच गेली असती.
इतवारा पोलीसांनी 13 लाख 80 हजारांच्या फसवणूकीत बाहेर राज्यातून पकडले दोन आरोपी