

नांदेड(प्रतिनिधी)-आज एसव्हीपी-एनपीए हैद्राबाद यांच्याद्वारे आयोजित फिटराईज 75 फिटनेस प्रोग्राम दरम्यान झालेल्या 5 किलो मिटर मॅरेथॉन स्पर्धेत नांदेड येथील पोलीस अंमलदारांनी भाग घेतला. त्यात जलद प्रतिसाद पथकातील पोलीस अंमलदार विनोद भुसारे यांनी 19.10 मिनिटात 5 किलो मिटर अंतर पार करून प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्यांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, डॉ.अश्र्विनी जगताप यांनी सन्मानीत केले.
आज सकाळी पोलीस विभागातील अनेक अधिकारी आणि अनेक कर्मचाऱ्यांनी 5 किलो मिटर मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला.तसेच या स्पर्धेमध्ये एसव्हीपी-एनपीए हैद्राबाद येथील आणि नांदेड मधील अनेक युवक-युवतींनी सहभाग घेतला. मॅरेथॉनची सुरूवात पोलीस मुख्यालयातून झाली ती असर्जन येथील सप्तगिरी प्लॉझापर्यंत गेली आणि पुन्हा पोलीस मुख्यालयात या मॅरेथॉन स्पर्धेचा समारोप झाला. एकूण 560 प्रतिस्पर्धांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला. त्यात जिंकणाऱ्या मुलांची नावे आणि त्यांची वेळ कंसात लिहिली आहे.रविंद्र रापू घोडके(17.28.63), संतोष विठ्ठल उत्तरवार (18.02.26), रवि शेषराव पवार(18.29.55), जिंकणाऱ्या मुली पुढील प्रमाणे आहेत. सोनल शामराव सदावर्ते (21.44.18), वैष्णवी विनोद दुधमल(23.32.80), शिवनंदा यलप्पा येमलवाड(24.12.30) तसेच नांदेड जिल्हा पोलीस दलातील क्युआरटी पथकातील जवान विनोद भुसारे बकल नंबर 1023 यांनी ही 5 किलो मिटर स्पर्धा 19.10 मिनिटात पुर्ण केली.
पोलीस मुख्यालयात या सर्व विजेत्यांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, डॉ.अश्र्विनी जगताप यांनी पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.
