नांदेड(प्रतिनिधी)-गोदावरी नदीचा पाट शुध्द पाण्याऐवजी ड्रेनेजचे चेंबर फुटून नदीत वाहतांना दिसतो तेंव्हा ज्या नदीबद्दल आम्हाला आदर आहे. त्या नदीचे बदलते स्वरुपा पाहुन मनाला दु:ख होते. स्वच्छ नांदेड.. सुंदर नांदेड… असे सांगणाऱ्या महानगरपालिकेला सुध्दा या प्रकरणाची माहिती नाही.
काल दि.26 ऑक्टोबर रोजी गोदावरी नदीकाठावर जाण्याचा प्रसंग आला. गोवर्धनघाट येथे नदीजवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी असलेले ड्रेनेज चेंबर फुटून त्यातील सर्व घाण नदीमध्ये वाहत होती. आपल्या श्रध्दा अर्पण करण्यासाठी भाविक गोदावरी नदीच्या काठावर येतात. पण तेथे वाहनारी हे ड्रेनेजची घाण पाहुन त्यांचे मन विषन्न होते. सोबतच भाविकांच्या सुध्दा भरपूर चुका आहेत. नदीकाठी जातांना फुलांचे गाठोडे, खाण्या-पिण्याच्या वस्तु ते नदीत टाकतात आणि त्यामुळे नदी पुन्हा घाणच होते. आजच्या परिस्थितीत नदीमध्ये वाहते पाणी नाही म्हणून त्या घाणीचे साम्राज्य मोठ्या स्वरुपात स्पष्ट होते. स्वच्छ नांदेड… सुंदर नांदेड अशा पाट्या लावून महानगरपालिका आपलीच पाठ थोपटून घेत असते. सध्या असलेले मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी या घाणेरड्या परिस्थितीकडे लक्ष देण्याची नक्कीच गरज आहे.
गोदावरी नदी ड्रेनेजच्या पाण्याने भरली