नांदेड(प्रतिनिधी)-करीता अशी स्वाक्षरी शासनाच्यावतीने बंद करण्यात आली आहे. एखाद्या विशेष घटनेमध्ये तसे करावे लागले तर स्वाक्षरी करणाऱ्याचे नाव आणि पदनाम त्या करीताच्या खाली असणे आवश्यक आहे. परंतू वजिराबाद पोलीस निरिक्षकांच्या हुद्यावर करीता म्हणून स्वाक्षरी करत स्वाक्षरी करणाऱ्याने गुरूद्वारा सचखंड बोर्डाकडे 35 निवासी कक्ष मोफत मागितले आहेत.
दि.25 ऑक्टोबर रोजी वजिराबाद येथील जावक क्रमांक 528/2023 नुसार अधिक्षक गुरूद्वारा सचखंड बोर्ड नांदेड यांना एक पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्रात दि.26 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान नांदेड पोलीस परिक्षेत्रीय क्रिडा स्पर्धा होणार आहेत. त्यासाठी पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांच्या निवासासाठी पंजाब भवनमधील 35 कक्ष विनामुल्य देऊन सहकार्य करावे असे लिहिले आहे. हे पत्र गुरूद्वारा बोर्डात 25 ऑक्टोबर रोजी प्राप्त झाले. त्यावर 1398/2023-2024 असा आवक क्रमांक आहे.
या अर्जावर करीता असा छोटासा एफ मारुन कोणी तरी स्वाक्षरी केली आहे. शासनाने सन 2018 मध्ये जारी केलेल्या परिपत्रकानुसार करीता ही स्वाक्षरी करून कोणताही पत्रव्यवहार करायचा नाही. करायचाच असेल, अशी गरज असेल, वेळ नसेल तर करीता स्वाक्षरी करणाऱ्याने आपले नाव आणि आपला हुद्दा त्या करीता खाली लिहिणे आवश्यक आहे. कायद्याचे सर्वात मोठे ज्ञान असणाऱ्या पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांच्या कार्यालयात असे घडते हा आश्चर्याचा विषय आहे.
शासनाने सन 2018 मध्ये जारी केलेल्या परिपत्रक
