
नांदेड(प्रतिनिधी)-आरसीपी पथकातील जमादाराला वजिराबादचे पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेबांनी अत्यंत घाणेरड्या शिव्या दिल्यामुळे 52 वर्षीय आरसीपी पथक प्रमुख दवाखान्यात ऍडमिट झाला आहे. हा प्रकार काल दुर्गा विसर्जनाच्यावेळी घडला.
वजिराबादमध्ये तात्पुरर्त्या स्वरुपात कार्यरत पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब हे ख्यातनाम व्यक्तीमत्व आहेत. काल सायंकाळी माहिती प्राप्त झाल्यानंतर आम्ही लोटस हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असलेल्या आरसीपी पथकातील रामदास कायंदे यांची भेट घेतली. त्यांच्यावर गणवेशाच्या कपड्यातच उपचार सुरू होते. त्यांचे वय 52 वर्ष आहे. ते एसआरपीएफ जालना येथून नांदेडला आलेले आहेत. आरसीपी पथकात त्यांना पथकप्रमुख म्हणून नेमणूक आहे.
मागील दोन दिवसांपासून त्यांच्या पथकाची ड्यिुटी वजिराबाद पोलीस ठाण्यात होती. म्हणजेच ते श्री.अशोकरावजी घोरबांड यांच्या आदेशानेच काम करत होते. पहिल्या दिवशी रात्री 4 वाजेपर्यंत नोकरी करून रामदास कायंदे यांचे पथक घरी गेले होते आणि दुसऱ्या दिवशी अर्थात 26 ऑक्टोबर रोजी पुन्हा दुर्गा विसर्जन होते म्हणून कायंदे यांचे आरसीपी पथक तेथेच कार्यरत होते. वेळेमधल्या काही कमी जास्त भागात पोलीस निरिक्षक हे कायंदेवर रागावले. पण रागावतांना त्यांचा तोल गेला आणि वाईट शब्दांचा परिणाम कायंदेवर झाला. त्यानंतर कायंदे पायी चालत वजिराबाद चौककडे आले तेंव्हा त्यांनी ऐकलेले घाणेरडे शब्द त्यांच्या डोक्यात घुमसत होते. त्यामुळे त्यांना चक्कर आली. वजिराबाद येथे हजर असलेल्या काही पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितले की मला चक्कर येत आहे. त्यानंतर मला काही कळले नाही आणि मी बेशुध्द पडलो.दवाखान्यात आल्यानंतर मला समजले असे कायंदे सांगत होते.
तुम्ही नोकरीच केली नाही म्हणून माझा घोरबांडने रिपोर्ट लावला.मला धमकी दिली की, तुमचे पाहतो, घाण-घाण शिव्या दिल्या.मी माफी मागितली असता माफी होणार नाही असे सांगितले. तेंव्हा याता निलंबित होईल म्हणून मला भिती वाटत होती. माझे लेकर शिकत आहेत, मी अडचणीत येईल आणि मी माझ्या लेकरांना कसा शिकवेल याबद्दल भिती वाटू लागली अशी सर्व हकीकत रामदास कायंदे यांनी वास्तव न्युज लाईव्हला सांगितली. पोलीस महासंचालकांनी पोलीस अंमलदारांसोबत कसे वागायचे असते याबद्दल याबद्दल एक एसओपी काढलेला आहे. त्या एसओपीला कचऱ्याच्या पेटीत टाकून पोलीस निरिक्षक श्री.अशोक घोरबांड यांनी रामदास कायंदेसोबत केलेला व्यवहार समर्थनिय नाहीच.