नांदेड(प्रतिनिधी)-28 व्या नांदेड पोलीस परिक्षेत्रीय क्रिडा स्पर्धांचे उद्घाटन आज नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले.
नांदेड पोलीस परिक्षेत्रीय क्रिडा स्पर्धा दि.27 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान नांदेड जिल्ह्यात होणार आहेत. या स्पर्धांमध्ये नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांचे पोलीस संघ सहभागी होणार आहेत . आज पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी या स्पर्धेचे शुभारंभ केले. या स्पर्धांमध्ये सांघीक, वैयक्तीक क्रिडा स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धा यशस्वीत व्हाव्यात म्हणून विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. आजच्या शुभारंभ प्रसंगी अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, डॉ .अश्र्विनी जगताप, राखीव पोलीस निरिक्षक विजय धोंडगे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांची उपस्थिती होती.
28 व्या नांदेड पोलीस परिक्षेत्रीय क्रिडा स्पर्धांचे उद्घाटन श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले