नांदेड(प्रतिनिधी)-दि.26 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता एका अनोळखी 35-40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह मल्टीपर्पज हायस्कुल शाळेजवळ सापडला आहे. वजिराबाद पोलीसांनी या बाबत आकस्मात मृत्यूची नोंद करून अनोळखी मयताच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी शोध पत्रिका जारी केली आहे.
मनपा शौचालय चालक मनोज काळूराम शिंदे (36) यांनी दिलेल्या खबरीनुसार दि.26 ऑक्टोबरच्या सायंकाळी 7 वाजता मल्टीपर्पज हायस्कुल जवळील शौचालयासमोर एक 35 ते 40 वयोगटाच्या अनोळखी माणुस मृत अवस्थेत पडलेला आहे. वजिराबाद पोलीसांनी या खबरीवरुन आकस्मात मृत्यू क्रमांक 82/2023 दाखल केला. त्याचा तपास पोलीस अंमलदार एस.आर.मठपती बकल नं.1218 यांच्याकडे देण्यात आला. मठपती यांनी या अनोळखी मयताची ओळख पटावी म्हणून शोध पत्रिका जारी केली आहे. त्यानुसार मरणारा अनोळखी व्यक्ती 35 ते 40 वयोगटातील आहे. त्याची उंची 170 सेंटीमिटर आहे. त्याचा रंग गोरा आहे. त्याचा बांधा मजबुत आहे. त्याचा चेहरा लांबट आहे. अनोळखी मयताच्या उजव्या हाताच्या पोटरीवर नरेंद्रसिंह असे गोंदलेले आहे. अनोळखी मयताच्या अंगावर भगव्या रंगाचा टी शर्ट, मेंहदी रंगाची अंडरवेअर व काळ्या रंगाचा नाईट पॅन्ट परिधान केलेला आहे. जनतेने या अनोळखी मयत व्यक्तीबाबत कोणास माहिती असेल तर त्यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यातील दुरध्वनी क्रमांक 02462-236510 किंवा पोलीस अंमलदार एस.आर.मठपती यांचा मोबाईल क्रमांक 9422644113 यावर माहिती द्यावी असे कळवले आहे.