नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या नेतृत्वात पोलीस विभागाने महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त अभिवादन केले. महर्षी वाल्मिकीजयंतीचा कार्यक्रम महानगरपालिकेत सुध्दा पार पडला.
28 ऑक्टोबर हा महर्षी वाल्मिकी ऋषींचा जन्म दिन. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरिक्षक नामदेव रिठ्ठे, सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे यांनी महर्षी वाल्मिकी ऋषींना पुष्पअपर्ण करून अभिवादन केले. याप्रसंगी पोलीस अधिक्षक कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुर्यभान कागणे, पोलीस अंमलदार संजय सांगवीकर यांनी केले.
महानगरपालिकेच्या प्रशिक्षण हॉलमध्ये महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी राजकुमार लोहिया, साईमुदीराज, डी.एस.प्रधान, शाम देशमुख, आनंदा खानसोळे यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.
