नांदेड(प्रतिनिधी)-दक्षीण मध्य रेल्वे कार्यालयात मुलाला नोकरी लावतो म्हणून पाच लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या एकाविरुध्द विमानतळ पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सुभाष लालप्पा बोडके हे हॉटेल व्यवसायीक आहेत. त्यांच्या मुलाला दक्षीण मध्ये रेल्वे कार्यालय येथे नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 5 लाख रुपये प्रकाश मारोती पाईकराव या व्यक्तीने घेतले. हा प्रकार 31 ऑक्टोबर 2020 ते 2 फेबु्रवारी 2022 दरम्यान पोलीस कॉलनी सोसायटी शोभानगरमध्ये घडला. त्यांनी याबाबतची तक्रार 28 ऑक्टोबर रोजी दिल्यानंतर 5 लाख रुपये फसवणूकीचा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानतळ पोलीसांनी या प्रकरणी प्रकाश मारोती पाईकराव विरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 406 प्रमाणे गुन्हा क्रमांक 349/2023 दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक प्रदीप गौंड यांच्याकडे देण्यात आला आहे.
दक्षीण मध्य रेल्वे कार्यालयात नोकरी लावतो म्हणून 5 लाखांची फसवणूक