नांदेड जिल्ह्यात एस.टी.चे चाके थांबले

नांदेड(प्रतिनिधी)-मराठा आरक्षण मिळावे म्हणून सकल मराठा समाजाच्यावतीने राज्यभर आंदोलन सुरू केल आहे. यातच मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यासाठी रविवारपासून सर्वत्र आमरण उपोषण सुरु केल आहे. राज्य परिवहन महामंडळाने खबरदारीचा पर्याय म्हणून रविवार दि.29 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजेपासून जिल्ह्यातील सर्वच आगारातील बसेस सेवा बंद केल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाकडून देण्यात आली. शुक्रवार दि.27 ऑक्टोबर रोजी हदगाव तालुक्यातील एस.टी.बस जाळण्यात आली. याचीच खबरदारी म्हणून राज्य परिवहन महामंडळाने नांदेड-हदगाव, कंधार, मुखेड, देगलूर, बिलोली, किनवट, भोकर आणि माहूर या 9 आगारातील सर्वच मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाने बसेस सेवा रविवारपासून बंद केल्या आहेत. मराठा आरक्षण मिळण्यासाठी जालना येथील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. याच उपोषणाला राज्यात दिवसेंदिवस वाढता पाठींबा मिळत आहे. मराठा आरक्षण मिळण्यासाठी सर्वच समाजाने या आंदोलनात सहभाग घेतला असून राज्यातील अनेक गावात पुढाऱ्यांना गाव बंदी केली आहे. तर काही राजकीय पुढाऱ्यांच्या गाड्याही आंदोलकांनी फोडल्या. यातच आंदोलकांनी शुक्रवार दि.27 ऑक्टोबर रोजी नांदेड आगाराची बस पेटून दिली. यामुळे एस.टी. महामंडळाने खबरदारी घेत जिल्ह्यातील सर्वच मार्गावर धावणाऱ्या बसेस सेवा बंद केल्या आहेत याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, वरिष्ठांचा आदेश येईपर्यंत बस सेवा बंद राहणार असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळ नांदेड विभागाने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *