नांदेड(प्रतिनिधी)-धर्माबाद तालुक्यातील चिकना या गावातून 29 ऑक्टोबर रोजी 36 वर्षीय व्यक्ती बॅंकेच्या कर्जाला कंटाळून घरातून निघून गेला आहे. या संदर्भाने धर्माबाद पोलीसांनी शोध पत्रिका जारी करून जनतेला आवाहन केले आहे की, या बेपत्ता व्यक्तीला शोधण्यासाठी मदत करावी.
मौजे चिकना ता.धर्माबाद येथील दत्ताहरी लक्ष्मण कदम यांनी 30 ऑक्टोबर रोजी धर्माबाद पोलीसांकडे अर्ज दिला की, त्यांचा चुलत भाऊ धोंडजी पिराजी कदम (36) हा बॅंकेचे कर्ज, दारुची सवय यामुळे घरातून निघून गेला आहे. धर्माबाद पोलीसांनी या संदर्भाने मिसिंग क्रमांक 28/2023 दाखल केला आहे. या बाबतचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक एस.ए.आडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
धर्माबाद पोलीसांनी या संदर्भाने बेपत्ता व्यक्तीचा फोटो आणि त्याचे वर्णन प्रसिध्दीसाठी पाठविले आहे. त्यानुसार गायब झालेले व्यक्ती धोंडजी पिराजी कदम (वय 36) यांचा रंग सावळा आहे, उंची 5 फुट 6 इंच आहे, त्यांनी घरातून जातांना पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केलेली आहे. त्यांच्या पायात चप्पल आहे, चेहरा लांबट आहे, नाक सरळ आहे, बांधा सडपातळ आहे, धोंडजी कदम यांचे शिक्षण 8 वी पर्यंत झालेले आहे, त्यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते.
धर्माबादचे पोलीस निरिक्षक अभिषेक शिंदे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, छायाचित्रात दिसणारा माणुस जनतेतील कोणास आढळल्यानंतर त्यांनी धर्माबाद पोलीसांना माहिती द्यावी. अभिषेक शिंदे यांचा मोबाईल क्रमांक 8975769508 यावर आणि सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक एस.ए.आडे यांचा मोबाईल क्रमांक 9552060875 यावर सुध्दा बेपत्ता झालेल्या धोंडजी कदम यांच्या बाबतची माहिती देता येईल.
चिकना ता.धर्माबाद येथून 36 वर्षीय व्यक्ती बेपत्ता ; धर्माबाद पोलीसांचे जनतेला आवाहन