नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील उस्मानशाही मिलच्या फुटबॉल मैदानाजवळ एका 35 वर्षीय व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज सकाळी 8 ते 8.30 वाजेच्यासुमारास उस्मानशाही मिलच्या फुटबॉल मैदानाजवळ दारु पिण्यासाठी पैसे दे या वादातून झालेल्या भांडणात नांदेड जिल्ह्यातून हद्दपार आरोपी रितेश मानेने राजू यलय्या मंदा (35) याच्या डोक्यात दगडाने ठेचून त्याचा खून केला आहे. घटनेची माहिती मिळताच वजिराबादचे सहाय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय मंठाळे, शिवराज जमदडे आणि त्यांचे अनेक पोलीस सहकारी घटनास्थळी पोहचले. मात्र मारेकरी रितेश माने हा पळून गेला होता. वजिराबाद पोलीस त्याचा शोध घेत आहेत. वृत्तलिहिपर्यंत इतर कायदेशिर प्रक्रिया पुर्ण झालेली नव्हती.
पक्कीचाळ परिसरात दगडाने ठेचून एकाचा खून