नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील माहेश्र्वरी भवन कौठा येथे दि.1 नोव्हेंबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत प.पू.श्री.मदनमोहनजी महाराज यांची शिवपुराण व रामायण, भागवत-गिता कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
मानवाच्या कल्याणासाठी सनातन धर्म गंगा नित्य नियमाने वाहणाऱ्या परम श्रध्देय प.पू.मोहनदासजी महाराज जयपूर राजस्थान यांच्या मुख्यातून शिवपुराण कथा नांदेडमधील सर्व धर्मिय भक्तांना हा लाभ घेता येणार आहे. ही कथा कौठा नांदेड येथील माहेश्र्वरी भवन येथे दि.1 ते 3 नोव्हेंबर या कालावधीत दुपारी 3 ते 5 या वेळेत या कथेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कथेचा लाभ जास्तीत जास्त भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन या कथेचे आयोजक संत श्री.मोतीराम महाराज सत्संग समिती, नांदेड आणि नंदीग्राम माहेश्र्वरी ज्येष्ठ नाुगरीक संघटना नांदेड आणि गौ सेवा समिती नांदेड यांच्यावतीने करण्यात आले आहे.