नांदेड(प्रतिनिधी)-अंगावर लघवी केल्याच्या कारणावरून एका 35 वर्षीय व्यक्तीला जनावरांच्या गळ्यात बांधल्या जाणाऱ्या लोढण्याने (लाकुड) डोक्यात जबर वार करून त्याचा खून केल्याचा प्रकार वाई ता.मुदखेड येथे 28 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजेच्यासुमारास घडला आहे.
गंगाबाई विश्र्वंभर सुर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा दशरथ विश्र्वंभर सुर्यवंशी(35) यास तु आमच्या अंगावर लघवी का केलास म्हणून शुभम सोनाजी लामटिळे, सुदर्शन लामटिळे हे दोघे मारत होते. दशरथ सुर्यवंशी समजून सांगत असतांना जनावरांच्या गळ्यात बांधणाऱ्या लोढण्याने दोघांनी दशरथच्या शरिरावर अनेक जखमा केल्या, त्याचे डोके फोडले आणि त्यातच दशरथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला.
मुदखेड पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 302 सह इतर कलमान्वये गुन्हा क्रमांक 204/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक वसंत सप्रे हे करत आहेत.
वाई ता.मुदखेड येथे खून