नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील हडको जाणाऱ्या रस्त्यावरील दुध डेअरीजवळून एका दुचाकी गाडीतून 2 लाख 70 हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिणे चोरीला गेले आहेत.
प्रमोद नागनाथराव शहाणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 ऑक्टोबरच्या रात्री8 वाजता ते अण्णाभाऊ साठे चौकातून दुध डेअरीजवळ आले. त्यांनी ऍक्टीवा उभी केली आणि दुध देऊन नंतर आपल्या दुचाकी क्रमांक एम.एच.26 ए.जे.1518 ची डिकी उघडून पाहिली असता त्या डिक्कीत पिशवीत ठेवलेले 2 लाख 70 हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिणे चोरीला गेले होते. नांदेड ग्रामीण पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक जामोदकर अधिक तपास करीत आहेत.
2 लाख 70 हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिणे चोरी