नांदेड(प्रतिनिधी)-काही जणांनी इतवारा भागात एका 52 वर्षीय व्यक्तीवर जिवघेणा हल्ला के ल्याचा प्रकार घडला आहे. या तक्रारीत सहा जणांची नावे आहेत.
शेख रहिमोद्दीन शेख ताजोद्दीन (52) हे भंगार व्यवसायकी हतईसमोरुन जात असतांना अथर उर्फ चुडू, खिजर उर्फ के.पी. वासे खलीफा, जुनेद खलीफा, सोहेल उर्फ गुड्डू, परवेज उर्फ बल्लू सर्व रा.मोमीनपुरा इतवारा यांनी त्यांची दुचाकी अडवून जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून तलवार, लोखंडी रॉड या सहाय्याने शरिरावर अनेक ठिकाणी वार केले. हा प्रकार 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 8 वाजेच्यासुमारास घडला. सध्या त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतवारा पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.
52 वर्षीय इसमावर जिवघेणा हल्ला