नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीवर कोण बसणार याची आर्तुता आता संपली आहे. पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी स्थानिक गुन्हा शाखेचा प्रभार स्विकारला आहे.
मागील फेबु्रवारी 2023 या महिन्यापासून स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीबद्दल अनेकांनी आपल्या गुडघ्याला बाशिंगे बांधली होती. कारण 20 फेबु्रवारी रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना नांदेड ग्रामीण येथे पाठवून वजिराबादचे तत्कालीन पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांना स्थानिक गुन्हा शाखेत नियुक्ती दिली होती. या आदेशाविरुध्द चिखलीकरांना महाराष्ट्र न्यायाधीकरणाची दारे ठोठावली. तेथे त्यांना यश आले आणि न्यायाधीकरणांने त्यांच्या बदलीला स्थगिती दिली. त्यामुळे आज सेवानिवृत्त होईपर्यंत द्वारकादास चिखलीकर हे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक होते.
फेबु्रवारी महिन्यापासूनच अनेकांनी आपल्या गुडघ्याला बाशींगे बांधून ही खुर्ची माझ्याच बापाची असे बोलायला सुरूवात केली होती. त्यानंतर अनेक जण या रेसमध्ये आले. परंतू आज काही क्षणापुर्वी पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेचा पदभार सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकरांकडून स्विकारला आहे. त्यामुळे जे घोड्यावर बसून वरात काढण्याच्या तयारीत होते त्यांची वाट लागली आहे. यावरून हे पुन्हा एकदा सिध्द झाले योगेश्र्वराच्या छत्रछायेमुळे 100 जण 5 जणांचे काही वाकडे करू शकले नाही तसेच आज घडले आहे.
पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी स्थानिक गुन्हा शाखेचा पदभार स्विकारला