अर्धापूर(प्रतिनिधी)-काही दिवसांपुर्वी स्थानिक गुन्हा शाखेने हदगावच्या नदीकाठी एका जुगार अड्यावर धाड टाकल्यानंतर सुध्दा तो जुगार अड्डा स्वयंपाक गृहासह जोरात पुन्हा सुरू आहे. तसेच भोकरफाटा-बारड रस्त्यावर नव्याने गुलाम पाडला गेला आहे.
काल स्थानिक गुन्हा शाखेत नुतन पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी पदभार स्विकारला. त्या अगोदर एका आठवड्यापुर्वी स्थानिक गुन्हा शाखेत पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर असतांना नांदेड आणि विदर्भाला वेगळ्या करणाऱ्या पैनगंगेच्या काठावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली होती. त्या छाप्याची माहिती पोलीस प्रेसनोटमध्ये सुध्दा आलेली नव्हती. आजच्या परिस्थितीत तो जुगार अड्डा पुन्हा एकदा जोरात सुरू झाला आहे . आता तर तेथे स्वयंपाकगृह तयार करण्यात आले आहे. त्यात खिचडी, खारीबुंदी टाकून दिली जाते. सोबत चहा आहेच. हा जुगार अड्डा पुन्हा एकदा सुरू झाला आहे.
भोकरफाटा-बारड रस्त्यावर कलाकेंद्राजवळ असलेल्या एका बारच्या पाठीमागे एक नवीन जुगार अड्याचे शाही उद्घाटन करण्यात आले आहे. या जुगार अड्ड्यात काय-काय सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत याची माहिती अद्याप प्राप्त झाली नाही. तरी पण नव्याने गुलाम पडला हे म्हणायला नक्कीच वाव आहे. अर्धापूर येथे सहाय्यक पोलीस अधिक्षक गौहर हसन कार्यरत असतांना हा गुलाम पाडला गेला हे महत्वपुर्ण आहे.
आयपीएस अधिकारी गौहर हसन यांच्या हद्दीत भोकरफाट्याला पडला नवीन “गुलाम’