नांदेड(प्रतिनिधी)-एका अपंग व्यक्तीला दुर्गा महोत्सवादरम्यान मारहाण केल्याप्रकरणी इतवाराचे पोलीस निरिक्षक संतोष तांबे आणि इतर दोघांविरुध्द अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016(आर.पी.डब्ल्यू.डी.-ऍक्ट) नुसार कायदेशीर कार्यवाही व्हावी अशी मागणी विशेष पोलीस महानिरिक्षक आणि पोलीस अधिक्षकांकडे करण्यात आली आहे.
नांदेडच्या इतवारा भागात संजय नंदु धुलधाणी हे व्यक्ती राहतात. ते 90 टक्के दिव्यांग आहेत. त्यांच्या घरासमोर प्यारा भारत दुर्गा मंडळाकडून देवीची स्थापना करण्यात आली होती. या नवरात्र महोत्सवा या मंडळाने विविध उपक्रम राबविले. दि.19 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 10.16 वाजता इतवारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक संतोष तांबे हे आपल्या कर्मचाऱ्यांसोबत तेथे आले. त्यानंतर त्यांनी दांड्या खेळणे बंद करा ते बंद पण केले. तो नवरात्र महोत्सवाचा पाचवा दिवस होता. उर्वरीत पाच दिवसांसाठी दांडिया खेळण्याची वेळ अर्धातास वाढवून घ्यावी असा ठराव मंडळाने केला. त्यानुसार मी 19 ऑक्टोबर रोजी रात्री 10.45 ते 11 वाजेदरम्यान पोलीस ठाणे इतवारा येथे गेलो. तेथे साहेब नसल्यामुळे परत आलो. त्यानंतर 20 ऑक्टोबरच्या रात्री 12 ते 12.30 वाजेदरम्यान पोलीस अंमलदार फरकंटे यांचा कॉल आला आणि साहेबांनी चर्चा करण्यासाठी बोलावले असे सांगितले. त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आणि तेथे संतोष तांबे आल्याबरोबर गाडीतून उतरले आणि आर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत बोंढारकरला कोणी फोन करून सांगितले असे सांगत मला अपंग असतांना सुध्दा लाथा, थापडबुक्यांनी मारहाण केली. त्यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या पोलीस अंमलदाराने सुध्दा मला मारहाण केली. त्यावेळी पोलीस उपअधिक्षक नायक यांनी हा अपंग आहे जाऊ द्या प्रकरण अंगलट येईल असे म्हणून मला सोडण्यास सांगितले तरी पण मला खाली लोळवून मारहाण करत राहिले आणि नंतर हाकलून दिले. मी त्यानंतर विष्णुपूरी रुग्णालयात गेलो तेथे कायदेशीर एमएलसी नोंदवली आणि आता उपचार घेवून आपल्याकडे तक्रार देत आहे असे या निवेदनात लिहिले आहे. आर.पी.डब्ल्यू.डी. ऍक्ट 2016 मधील कलम 92, 92(अ) प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
