नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपले ओळखपत्र आपल्या शरिरावर दर्शनी भागात लावण्याबाबत सुचना जारी करण्यात आल्या आहेत. या अगोदर सुध्दा सन 2014 मध्ये असे शासन परिपत्रक काढण्यात आले होते. त्याचाही उल्लेख या परिपत्रकात केला आहे.
सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्य येथील उपसचिव रोशणी कदम पाटील यांनी जारी केलेल्या एका परिपत्रकानुसार राज्यातील नागरीक आपल्या वेगवेगळ्या कामांसाठी शासकीय कार्यालयात येतात. त्या संबंधीत शासकीय व्यक्तीची भेट होणे त्याचे नाव आणि पदनाम जनतेला माहित व्हावे म्हणून सन 2014 मध्ये शासनाने प्रत्येक शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपले ओळखपत्र आपल्या शरिरावर दर्शनी भागात लावावे अशी सुचना करण्यात आली होती.परंतू 2014 ला काढलेल्या शासन परिपत्रकाची पुर्णपणे अंमलबजावणी होत नाही असे निदर्शनास आल्यानंतर शासनाने आता पुन्हा एकदा 10 ऑक्टोबर 2023 रोजी नवीन शासन परिपत्रक जारी केले आहे. त्यात आपले ओळखपत्र काटेकोरपणे दररोज आपल्या शरिरावरील दर्शनी भागात लावावे अशा सुचना करण्यात आल्या आहेत. संबंधीत कार्यालयाच्या प्रमुखांनी याबाबत ओळखपत्र न लावणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत त्यांच्या कार्यवाही करून त्याचा मासिक अहवाल सामान्य प्रशासन विभागाला सादर करावा असे या आदेशात नमुद आहे. हे परिपत्रक शासनाच्या संकेतस्थळावर संगणक संकेेतांक 202310101640143507 प्रमाणे प्रसिध्द करण्यात आला आहे.
शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपले ओळखपत्र लावणे बंधनकारक