नांदेड(प्रतिनिधी)-चोरट्यांनी एक देशी दारुची दुकान फोडून त्यातून 2 लाख 25 हजार 860 रुपयांची दारु चोरली आहे. सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय मुखेड ही शाळा फोडून चोरट्यांनी 25 हजारांचे साहित्य चोरून नेले आहेत. मौजे घुंगराळा येथील खंडोबा मंदिराची दानपेटी फोडून चोरट्यांनी त्यातील 80 हजार रुपये चोरले आहेत.
लातूर फाटा येथील विजय बारच्या बाजुला हेमलता विश्र्वनाथ पवार यांच्या दारुच्या दुकानाचे मागील बाजूच्या दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी 2 लाख 25 हजार 860 रुपये किंमतीची देशी दारु चोरुन नेली आहे. याबाबतची तक्रार व्यवस्थापक सुनिल तुकाराम हनमंते यांनी दिलेल्यानंतर नांदेड ग्रामीण पोलीसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय मुखेड येथील मुख्याध्यापिका सुनिता गोवर्धन पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 ऑक्टोबरच्या दुपारी 4 ते 30 ऑक्टोबरच्या सकाळी 9.30 वाजेदरम्यान कोणी तरी चोरट्यांनी शाळेचे कुलूप तोडून संगणक विभागातील 25 हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेले आहे. मुखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक भारती अधिक तपास करीत आहेत.
गोविंद दत्ताबुवा भारती हे घुंंगराळा शिवारातील खंडोबा मंदिराचे पुजारी आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 31 ऑक्टोबरच्या सायंकाळी 7 ते 1 नोव्हेंबरच्या सकाळी 6 वाजेदरम्यान खंडोबा मंदिरातील 3 दानपेट्यांपैकी दोन दानपेट्या फोडून आणि एक दानपेटी उचलून सोबत घेवून गेले. त्यात जवळपास 80 हजार रुपये आहेत. कुटूंर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार पवार अधिक तपास करीत आहेत.
सव्वा दोन लाखांची देशी दारु चोरली; शाळा फोडली; मंदिराच्या दानपेट्या फोड्या