नांदेड(प्रतिनिधी)-दोन रुपयांच्या नाण्यासह चित-पट नावाचा जुगार घेणाऱ्या सहा जणांना पकडून 5 लाख 4 हजार 902 रुपयांचा मुद्देमाल उस्माननगर पोलीसांनी जप्त केला आहे.
उस्माननगर येथील पोलीस उपनिरिक्षक सुनिल पल्लेवाड यांनी 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्यासुमारास मौजे सावळेश्र्वर येथे पाण्याच्या टाकीखाली 2 रुपयांच्या नाल्यासह चित-पट नावाचा जुगार खेळणाऱ्या 6 जणांना पकडले. त्यांच्याकडून जुगार साहित्य, रोख रक्कम आणि 13 मोटारसायकली असा 5 लाख 4 हजार 902 रुपयांचा मुद्दमाल जप्त करण्यात आला आहे. चितपट खेळणारे जुगारी नागोराव बालाजी कदम (33) रा.सावळेश्र्वर, राजू बापूराव घोडके (38) रा .बाचोटी ता.कंधार, पांडूरंग भरत कदम (24) रा.कुंटूर ता.नायगाव, अवधुत नारायण बोईनवाड (30) रा .मसलगाव ता.कंधार, प्रकाश वामन कदम (32) रा.सावरखेड ता.नायगाव, विकास धोंडोपंत मंदावाड(26) रा.हळदा ता.कंधार असे आहेत. या सर्वांना विरुध्द महाराष्ट्र जुगार कायदा 12(अ) नुसार उस्माननगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 162/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवप्रसाद मुळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार मुंडे करीत आहेत.
चित-पट खेळणारे 6 जुगार पकडले; 5 लाखांचा मुद्देमाल जप्त