नांदेड(प्रतिनिधी)-ऑल इंडिया इन्स्टीट्युट ऑफ मेडीकल सायन्स (आयएन-सीईटी) चा परिक्षा फॉर्म न भरता खोटी पोच पावती दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैद्यकीय अधिकारी असलेल्या स्वाती मोहनराव घहिनवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता त्यांनी श्री.गुरू गोविंदसिंघजी इंजिनियरींग कॉलेज समोर असलेल्या प्रचित नेट कॅफेमध्ये आयएन-सीईटीचा अर्ज भरण्यासाठी गेल्या होत्या. त्यासाठी या प्रचित नेट कॅफेचे संचालक हेमंतकुमार रमाकांत चौदंते आणि संगणक चालक वैभव ज्ञानेश्र्वर नागरे यांनी त्यांच्याकडून आयएन-सीईटी परिक्षेची फिस घेवून ती संबंधीत विभागाला पाठवली नाही आणि त्यांचा अर्ज सुध्दा संबंधीत विभागाला सादर केला नाही. बनावटपणे पोच पावती व परिक्षा फॉर्म तयार करून ती खरी आहे असे भासवून स्वाती घहिनवाड यांना दिली.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 417, 467, 420, 471 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 791/2023 दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला आहे.
महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची फसवणूक