७ नोव्हेंबर रोजी भीम महोत्सवचे आयोजन 

नांदेड(प्रतिनिधी)-डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या शाळा प्रवेश दिनानिमित्त ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता कुसुम सभागृहात भीम महोत्सव होणार आहे..डॉ.बाबासाहेब शाळेत गेले तेव्हाच या देशात खऱ्या क्रांतीची सुरुवात झाली. त्यांच्या शिक्षणातून या देशाच्या संविधानाची व अर्थव्यवस्थेची निर्मिती झाली. बहुजनांच्या कोटी कोटी कुळांचा उध्दार झाला. या ऐतिहासिक भीम महोत्सवाचे उद्घाटन आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष कामाजी पवार, प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, डॉ. सिध्दार्थ जोंधळे, बालाजी इबितदार, अजय तुरेराव, शेखर घुंगरवार, शंकर शिंगे, स्वागताध्यक्ष डॉ. दिनेश निखाते, अनिल बोरीकर उपस्थित राहणार आहेत. भीमशाहीर मेघानंद जाधव प्रस्तुत परिवर्तनाचा वादळवारा, आंबेडकरी रॅपर विपीन तातड, बाल रॅपर स्वरुप डांगळे, कवी, गीतकार सचिन डांगळे यांचा कार्यक्रमही होणार आहे. सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रात काम करणाऱ्या आंबेडकरी विचारधारेच्या निष्ठावंतांचा गौरव ही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक प्रा. प्रबुध्द रमेश चित्ते, विशाल बोरगावकर, नितीन एंगडे, कुणाल भुजबळ, अंकुश सावते, लक्ष्मण वाठोरे, अविनाश गायकवाड, सोहन वंदने, मनोज भरणे, अतुल गवारे, हर्षवर्धन लोकडे, नागराज भद्रे, संदेश वाघमारे, अक्षय गायकवाड, इंजि. प्रशित चित्ते, शुभम खंदारे, भीमसेन पांगरेकर, योगेश केकाटे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *