नांदेड(प्रतिनिधी)-मॅफ्को(इतवारा) येथील जुगार अड्ड्यावर दुपारी झालेल्या भांडणाचा बदला मारेकऱ्यांनी सराफा भागात खून करून घेतला. यामध्ये एका भावाचा मृत्यू झाला असून दुसरा भाऊ गंभीर जखमी झाल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.
प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार आज दुपारी मॅफ्को येथील जुगार अड्ड्यावर सागर यादव आणि केशव पवार यांची आपसात भांडणे झाली. जुगार अड्ड्यावरची भांडणे अड्डा चालकांनी तेथेच मिटवली कारण त्यांना जुगार अड्डा चालवायचा असतो. असे अनेक जुगार अड्डे नांदेड शहरात आणि नांदेड जिल्ह्यात सुरू आहेत. याबाबत जुगार अड्ड्यावर झालेल्या भांडणांची माहितीच मिळत नाही. आज घडलेेल्या प्रकारात वास्तव न्युज लाईव्हला माहित झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार दुपारी जुगार अड्ड्यामध्ये सागर यादव रा.नावघाट नांदेड आणि केशव पवार रा.शनिमंदिरजवळ यांच्यात भांडणे झाली होती .
भांडण झाल्यानंतर सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास केशव पवारने तलवारीसोबत सागर यादवला सराफा भागात आव्हान दिले. तेथे झालेल्या हाणामारीत केशव पवारने आपल्या जवळ असलेल्या तलवारीने सागर यादवच्या डोक्यावर जबरदस्त प्रहार केला. सोबतच सागरचा भाऊ भानु यादव याच्यावरही हल्ला केला. झालेल्या हाणामारीत सागर यादव खाली पडल्यानंतर त्याला दवाखान्यात घेवून जाण्यात आले. परंतू दुर्देवाने दवाखान्यात जाण्यापुर्वीच त्याच मृत्यू झाला होता. याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केली. जखमी असलेल्या भानु यादववर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार आणि अनेक पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार घटनास्थळी दाखल झाले आहेत. मारहाण झाल्याबरोबर झटपट सराफा दुकाने बंद झाली. काही कारणांनी घडणाऱ्या अशा खून प्रकरणात पोलीसांसह जनतेने सुध्दा सहकार्य करण्याची अपेक्षा वास्तव न्युज लाईव्ह व्यक्त करत आहे. कारण जोपर्यंत जनता साथ देणार नाही तोपर्यंत गुन्ह्यांवर पुर्णपणे वचक बसविण्यात यश येईल. नाही तर महाराष्ट्राला बिहार होण्यास काही वेळ लागणार नाही. सागर यादव आणि केशव पवार यांच्यातच दुपारी जुगार अड्ड्यावर भांडण झाले होते काय? किंवा कोण्या इतरासोबत सागर यादवचे भांडण झाले आणि केशव पवारने सागर यादवने खून केला काय? याचाही शोध होणे आवश्यक आहे.
जुगार अड्ड्याच्या भांडणाचा बदला सराफा भागात खून करून