नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने एका चोरट्याला पकडून त्याच्याकडून चार दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. या दुचाकी गाड्यांची किंमत 3 लाख 5 हजार रुपये आहे. या चोरी प्रकरणातील एक दुचाकी पुणे जिल्ह्यातून चोरलेली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अनिकेत उर्फ सोनु सदाशिव बुक्तरे (21) रा.इंदिरानगर, वाडी (बु) नांदेड यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलीसांनी यामाहा, स्पेंडर प्लस, ऍक्टीव्हा स्कुटी, फॅशन प्रो अशा चार दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. या सर्व गाड्यांची किंमत 3 लाख 5 हजार रुपये आहे. चोरी केल्या गाड्यांची माहिती घेतली असता भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 375/2023 मधील चोरलेली एक दुचाकी यामध्ये आहेत. तसेच एक दुचाकी पोलीस ठाणे तळेगाव दाभाडे जि.पुणे येथून चोरून आणलेली आहे. इतर दोन गाड्यांची तपासणी होत आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराव धरणे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, पोलीस अंमलदार गुंडेराव कर्ले, बालाजी तेलंग, संजीव जिंकलवाड, देविदास चव्हाण, ज्वालासिंग बावरी या पथकाचे कौतुक केले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेने चोरीच्या चार दुचाकी पकडल्या; एक दुचाकी पुणे जिल्ह्यातली