नांदेड(प्रतिनिधी)-26 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या 27 लाख 50 हजार रुपयांच्या चोरीची तक्रार 7 नोव्हेंबरला कंधार पोलीसांनी दाखल केली आहे.
मोहम्मद युसूफ खान मोहमद्दीनखान रा.हातईपुरा कंधार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार माझ्या घरातून 26 ऑक्टोबरच्या सकाळी 11 वाजेपासून ते 6 नोव्हेंबरच्या रात्री 10 वाजेच्यादरम्यान कोणी तरी चोरट्यांनी माझ्या घराच्या वरच्या मजल्यावरील बंद रुमचा कडीकोंडा तोडून त्यातून 27 लाख 50 हजार रुपयांची चोरी केली आहे. एवढे पैसे एकदाच चोरीला गेल्यामुळे मला अस्वस्थ वाटू लागले. आज बरे वाटत असल्यामुळे मी तक्रार देत आहे. कंधार पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक आदित्य लोणीकर अधिक तपास करीत आहेत .
27 लाख 50 हजारांची चोरी